किमान तापमान : 23.14° से.
कमाल तापमान : 23.43° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 51 %
वायू वेग : 4.26 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.14° से.
22.99°से. - 26.45°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश24.98°से. - 27.28°से.
शनिवार, 25 जानेवारी कुछ बादल25.48°से. - 28.18°से.
रविवार, 26 जानेवारी छितरे हुए बादल25.59°से. - 27.73°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.32°से. - 27.45°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल24.72°से. - 26.64°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलनवज्योतसिंग सिद्धू यांचा इशारा,
नवी दिल्ली, २७ ऑगस्ट – माझ्याकडे पंजाब कॉंगे्रसचे अध्यक्षपद तर सोपविण्यात आले, पण निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार नाही. हे अधिकार मला देण्यात यावे, अन्यथा मी पुन्हा एकदा उठाव केल्याशिवाय राहणार नाही, असा गर्भित इशारा कॉंगे्रसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी आज शुक्रवारी दिला.
मला पद आहे, पण अधिकार नसल्याने मी स्वबळावर कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. पक्षाने अधिकार दिल्यास आगामी २० वर्षे पंजाबमध्ये फक्त कॉंगे्रसचीच सत्ता राहील, अशी व्यवस्था मी करू शकतो. या संदर्भातील कृती आराखडा तयार केला आहे, असे सिद्धू यांनी अमृतसरमध्ये आपल्या समर्थकांच्या बैठकीत सांगितले. पद द्यायचे आणि अधिकार दिले नसेल, तर त्या पदाला काहीच अर्थ उरत नाही. मला केवळ कार्यालयात बसायचे नाही, तर निर्णय घ्यायचे आहेत. पक्ष मोठा करायचा आहे. यासाठी आवश्यक ते अधिकार मिळत नसतील, तर ते पद मला नको, मी माझा निर्णय घेण्यासाठी मोकळा आहे, असे सांगताना सिद्धू यांनी पुन्हा बंडखोरीचे संकेत दिले.
पक्षाच्या चौकटीत निर्णय घ्या : कॉंगे्रस
सिद्धू हे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांना अधिकारही आहेत. मात्र, पक्षाच्या चौकटीत राहूनच त्यांनी निर्णय घ्यावे. पक्षघटनेचा सन्मान करावा, असा सल्ला कॉंगे्रसचे सरचिटणीस हरीश रावत यांनी त्यांना दिला. आम्ही त्यांना निर्णय घेण्यापासून रोखले नाही, पण त्यांचा निर्णय पक्षाच्या हितात असावा, असे रावत यांनी पत्रकारांना सांगितले.
नवज्योत सिद्धू यांच्या सल्लागाराचा राजीनामा
चंदिगड – पंजाब कॉंग्रेसमध्ये वाद सुरू असतानाच दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणारे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचे सल्लागार मालविंदरसिंग माली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
कॉंग्रेस नेतृत्वाने मालविंदरसिंग यांना आपल्या पदावरून हटवण्याचा आदेश सिद्धू यांना दिला होता. यानंतर माली यांनी स्वत:हून राजीनामा दिला. दरम्यान, माली यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले असून, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याह अन्य काही लोकांना जबाबदार ठरवले आहे. या संदर्भात सिद्धू यांना एक पत्र लिहिले आहे. माझ्या विरोधात काही लोकांनी आकसपूर्ण मोहीम चालवली आहे. जीवाला धोका झाल्यास वा हल्ला झाल्यास मुख्यमंत्री अमरिंदरसिंग, विजय इंद्र सिंगला, कॉंग्रेस नेते मनीष तिवारी, सुखबीरसिंह बादल, बिक्रमजीत सिंह मजिठिया यांच्यासह भाजपाचे सुभाष शर्मा, आम आदमी पार्टीचे राघव आणि जरनलसिंह जबाबदार असेल, असे म्हटले आहे. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सिद्धू यांनी ११ ऑगस्ट रोजी मालविंदरसिंग आणि प्यारेलाल गर्ग यांना सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. यानंतर माली यांनी काश्मीर हे भारताचा भाग असेल तर ३७० आणि ३५ ए अशा कलमांची काय गरज आहे, असा मुद्दा उपस्थित केला होता. तर, गर्ग यांनी मुख्यमंत्र्यांचा पाकिस्तानशी संबंध जोडला होता. यानंतर अमरिंदरसिंग यांनी दोघांच्याही वक्तव्याचा निषेध करत राज्य आणि देशासाठी धोकादायक असल्याचा आरोप केला होता.