किमान तापमान : 22.48° से.
कमाल तापमान : 23.45° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 52 %
वायू वेग : 2.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.48° से.
21.99°से. - 26.45°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश24.98°से. - 27.28°से.
रविवार, 26 जानेवारी कुछ बादल25.48°से. - 28.18°से.
सोमवार, 27 जानेवारी छितरे हुए बादल25.59°से. - 27.73°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.32°से. - 27.45°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल24.72°से. - 26.64°से.
गुरुवार, 30 जानेवारी टूटे हुए बादललखनौ, २२ ऑगस्ट – कल्याणसिंह हे सर्वसामान्यांच्या विश्वासाचे प्रतीक होते. ते स्वत:देखील अतिशय मोठे नेते होते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी आपल्या संवेदना व्यक्त केल्या.
कल्याणसिंह यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पंतप्रधान मोदी आज लखनौ येथे आले. त्यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मोदी म्हणाले की, देशाने कल्याणसिंह यांच्या रूपात एक महान नेता गमावला आहे. त्यांनी आयुष्यभर सर्वसामान्य जनतेची सेवा केली. त्यांच्या आईवडिलांनी ठेवलेले नाव सार्थकी लागावे, अशीच कामे त्यंानी केली आहे. जन कल्याण हाच त्यांचा मंत्र होता. मात्र, त्यांची काही स्वप्न अपूर्ण राहिली असून, त्यांच्या पूर्ततेसाठी आम्ही कठोर परिश्रम घेणार आहोत. प्रभू श्रीरामांच्या चरणी त्यांना जागा मिळावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
अडवाणींनी जागवल्या स्मृती
कल्याणसिंह यांच्या निधनामुळे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी भावुक झाले आहेत. कल्याणसिंह यांना श्रद्धांजली वाहताना अडवाणी यांनी राममंदिर आदोलनातील त्यांच्या योगदानाचे स्मरण केले. त्यांची कटिबद्धता, समर्पण आणि गांभीर्य हे राममंदिर उभरण्याचे स्वप्न पाहणार्या असंख्य भाजपा कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान होते, असे अडवाणी म्हणाले. रामजन्मभूमी आंदोलनाच्या प्रवासात कल्याणसिंह यांच्या अनेक आठवणी आहेत. त्यांचे निःस्वार्थ व्यक्तिमत्त्व पुढील अनेक पिढीला प्रेरणा देणारे ठरेल, असे अडवाणी यांनी म्हटले.
आज अन्त्यसंस्कार
उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते कल्याणसिंह यांच्या पार्थिवावर उद्या सोमवारी बुलंदशहरातील नरौरा येथील राजघाटावर संपूर्ण शासकीय इतमामात अन्त्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांची अन्त्ययात्रा मूळ गाव अत्रौली येथून निघून बुलंदशहर येथील नरौरा येथील राजघाटावर पोहोचेल. विविध राजकीय नेत्यांनी आणि सर्वच घटकांमधील मान्यवरांनी आज त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले व श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, कल्याणसिंह यांच्या सन्मानार्थ उत्तरप्रदेशात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
कल्याणसिंह २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत बुलंदशहरातून खासदार म्हणून निवडून आले होते. जनपद येथील डिबाई विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून ते १९९६ साली निवडून आले होते. नरौरा हे डिबाई मतदारसंघात येते.