किमान तापमान : 27.69° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 35 %
वायू वेग : 3.08 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
23.94°से. - 30.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.38°से. - 28.63°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.28°से. - 29.45°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.43°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.15°से. - 28.01°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.72°से. - 27.96°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलअमरिंदरसिंग यांची उपस्थिती,
चंदीगड, २३ जुलै – नवज्योतसिंग सिद्धू यांनी आज शुक्रवारी पंजाब कॉंगे्रस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग प्रामुख्याने उपस्थित होते. यामुळे सिद्धू आणि अमरिंदरसिंग यांच्यातील कटुता संपली असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
प्रदेश कॉंगे्रसच्या मुख्यालयात आयाजित कार्यक्रमात सिद्धू यांच्यासोबतच संगतसिंग गिलझियान, सुखविंदरसिंग डॅनी, पवन गोयल आणि कुलजितसिंग नागरा या चार कार्याध्यक्षांनीही पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी कॉंगे्रसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. पंजाब कॉंगे्रसचे प्रभारी हरिश रावत, माजी मुख्यमंत्री रजिंदर कौर भट्टल, पक्षाचे वरिष्ठ नेते प्रतापसिंग बाजवा आदी नेते या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी सिद्धू म्हणाले की, आज केवळ मी एकटाच नाही, तर राज्यातील कॉंगे्रसचा प्रत्येक कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष झाला आहे. यापुढे नेते आणि सामान्य कार्यकर्ते यांच्यात कुठलेही अंतर राहणार नाही.
कार्यकर्त्यांशिवाय कोणताही पक्ष उभा राहू शकत नाही. कार्यकर्ता हाच पक्षाच्या कणा असतो. सुनील जाखड यांच्याकडून सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. तत्पूर्वी त्यांनी पंजाब भवनात जाऊन अमरिंदरसिंग यांची भेट घेतली. पदग्रहण कार्यक्रमात हे दोघेही एकमेकांच्या बाजूलाच बसले होते.