किमान तापमान : 26.96° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 42 %
वायू वेग : 5.33 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
23.94°से. - 30.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.38°से. - 28.63°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.28°से. - 29.45°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.43°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.15°से. - 28.01°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.72°से. - 27.96°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलयोगी आदित्यनाथांचा राहुल गांधींवर हल्ला,
लखनौ, २४ जुलै – कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर फिरत आहे, ज्यात राहुल गांधी, आपल्याला उत्तरप्रदेशचे आंबे आवडत नाही, असे पत्रकारांना सांगत आहेत. यावरून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला. तुमची ‘टेस्ट’ (चव) फुटीरतावादी असल्याने तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे, अशी बोचरी टीका केली.
आपल्याला आंध्रप्रदेशचे आंबे आवडतात. हा लंगडा आंबा ठीक आहे, पण दशहरी जास्त गोड आहे, असे राहुल गांधी या व्हिडीओत सांगतात. हाच धागा पकडून योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. तुमची ‘टेस्ट’ फूट पाडणारी आहे.
तुमचे फुटीरतावादी संस्कार देशाला परिचित आहेत. तुमचे विभाजनवादी कुसंस्कार इतके प्रभावी आहेत की, फळांच्या चवीलाही प्रादेशिक वादाच्या आगीत ओढले. मात्र, लक्षात ठेवा, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारताचा स्वाद एकच आहे, असे आदित्यनाथ यांनी ट्विटरवर नमूद केले.
योगी आदित्यनाथ यांच्याआधी गोरखपूर येथील भाजपाचे खासदार रवी किशन यांनीही राहुल गांधींवर हल्ला चढविला. त्यांनी राहुल गांधींचा व्हिडीओ ट्विट करीत, राहुल गांधींना उत्तरप्रदेशचे आंबे आवडत नाहीत आणि उत्तरप्रदेशला कॉंग्रेस आवडत नाही, हिशेब बरोबर, असा चिमटा काढला. नेटकर्यांनीही राहुल गांधी यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. अनेकांनी राहुल गांधी अजूनही परिपक्व झाले नसल्याची टीका केली आहे.