किमान तापमान : 27.05° से.
कमाल तापमान : 28.34° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 4.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.34° से.
24.55°से. - 28.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.91°से. - 28.4°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.68°से. - 28.77°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.68°से. - 28.73°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.16°से. - 28.59°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.07°से. - 27.85°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलदोन दिवसांत मिळणार नवा मुख्यमंत्री,
बंगळुरू, २६ जुलै – कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा यांनी आज सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सायंकाळी त्यांनी राजीनामा राज्यपाल थावरचंद गहलोत यांच्याकडे सोपविला असून, येत्या दोन दिवसांतच नव्या मुख्यमंत्र्याची निवड केली जाणार आहे.
मी आपला राजीनामा राज्यपालांना सोपविला आहे आणि तो मंजूर करण्याची विनंतीही केली आहे. नवे मुख्यमंत्री कोण असावे, याबाबतची कुठलीही शिफारस मी केलेली नाही, असे त्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.
मी अजिबात दु:खी नाही. आतापर्यंत मी कर्नाटकची सेवाच केली. वृद्धापकाळामुळे आता मी विश्रांती घेत आहो. राज्यातील नागरिकांची सेवा केल्याचे समाधान आहे. अतिशय आनंदाने मी राजीनामा देत आहे, त्यांनी स्पष्ट केले.
मागील आठवड्यात येदीयुरप्पा यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेटही घेतली होती. तेव्हापासूनच त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली होती.
वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर देखील पंतप्रधान आणि भाजपाध्यक्षांनी मला मुख्यमंत्री होण्याची संधी दिली, यासाठी मी त्यांचा आभारी आहे. ज्या नेत्याने वयाची ७५ वर्षे पूर्ण केली, त्याने निवडणूक लढवू नये आणि सरकारमध्ये कोणत्याही पदावर राहू नये, असा अलिखित नियम भाजपात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस माझ्यासाठी परीक्षेचे होते. त्या काळात राज्याला भीषण पुराचा फटका बसला होता. त्या काळात, तर मंत्रिमंडळ विस्तारही झालेला नव्हता, अशी आठवण त्यांनी करून दिली.
तीन नावांची चर्चा
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत तीन नावे आघाडीवर आहेत. यात सर्वांत पुढे असलेले नाव प्रल्हाद जोशी यांचे आहे. प्रल्हाद जोशी हे मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. ते उत्तर कर्नाटकमधील खासदार आहेत. प्रल्हाद जोशी यांच्यासह बी. एल. संतोष, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचे नावही चर्चेत आहेत.
नड्डा यांनी घेतली अमित शाह यांची भेट
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा यांनी राजीनामा दिल्यामुळे कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री कोण राहणार, याबाबत चर्चा करण्यासाठी संसदभवनातील कार्यालयात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदीही आज बराच वेळ संसदभवनातील आपल्या कार्यालयात होते.