किमान तापमान : 26.14° से.
कमाल तापमान : 27.37° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 2.98 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.37° से.
23.94°से. - 28.01°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 28.79°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलवाद सोडविण्याची क्षमता केवळ लोकशाहीतच,
श्रीनगर, २७ जुलै – हिंसाचार हा काश्मिरी संस्कृतीचा भाग कधीच नव्हता. या हिंसाचारामुळे ‘काश्मिरीयत’चे फार मोठे नुकसान झाले. सर्वच प्रकारचे वादविवाद सोडविण्याची क्षमता केवळ लोकशाहीतच आहे. लोकशाहीमुळे जीवनात आनंद येतो आणि काश्मिरी जनता आज याच आनंदाचा अनुभव घेत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज मंगळवारी येथे केले.
लोकशाहीच्या क्षमतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. लोकशाही नागरिकांना एकत्र आणते. अलिकडील काळात काश्मिरी नागरिकांनी याचा अनुभव घेतला आहे, असे राष्ट्रपतींनी काश्मीर विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्याला संबोधित करताना सांगितले. राष्ट्रपती चार दिवसांच्या काश्मीर दौर्यावर आहेत.
काश्मीरची संस्कृती शांततेत जीवन जगण्यास प्रेरित करणारी होती. हिंसाचाराला या संस्कृतीत कधीच जागा नव्हती. आता मात्र हिंसाचार रोजचाच झाला असून, यामुळे शांतता संपुष्टात आली आहे. या हिंसाचारामुळे काश्मिरी संस्कृतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सध्या येथे जो हिंसाचार सुरू आहे, तो एखाद्या विषाणूसारखाच असून, त्यावर तातडीने आणि कायमस्वरूपी उपचार करण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे जम्मू-काश्मिरात नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. काश्मीरचे गमावलेले वैभव लवकरच पुन्हा एकदा प्राप्त होईल, असा माझा विश्वास असल्याचे राष्ट्रपती म्हणाले.
काश्मीर हे भारताचे नंदनवन आहे. विविध संस्कृती जोपासणार्या नागरिकांचे एकत्र येण्याचे स्थान आहे. येथे अनेक धार्मिक परंपरा जोपासण्यात आल्या आहेत. आज हा प्रदेश केवळ हिंसाचाराने ग्रासला आहे, असेही त्यांनी सांगितले.