किमान तापमान : 25.35° से.
कमाल तापमान : 25.78° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 2.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.78° से.
24.34°से. - 28.79°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.15°से. - 28.48°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर साफ आकाशउत्तरप्रदेश एटीएसची कारवाई, तिघांना अटक, म्यानमार, बांगलादेशातून महिला, बालकांची तस्करी,
लखनौ, २७ जुलै – मोठ्या प्रमाणात मानवी तस्करी करणारी रोहिंग्यांची टोळी उत्तरप्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आज मंगळवारी उद्ध्वस्त केली. या प्रकरणात टोळीतील तीन सदस्यांना अटक करण्यात आली आहे. म्यानमार आणि बांगलादेशातून महिला आणि बालकांची तस्करी करून ही टोळी त्यांना दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरात आश्रय उपलब्ध करून द्यायची. देशात घुसखोरी करणारे रोहिंगे आता महिलांच्या तस्करीतही गुंतले असल्याचे आज झालेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
भारतात बेकायदेशीर रीत्या वास्तव्य करणार्या रोहिंग्यांची ही टोळी मानवी तस्करीच्या माध्यमातून लोकांकडून पैसे उकळायची. म्यानमारमधून मोठ्या प्रमाणात बालकांची तस्करी करून त्यांना दिल्ली-राष्ट्रीय राजधानी परिसर आणि नोएडात बेकायदेशीर आश्रय उपलब्ध करून दिला जायचा. भारतात घुसखोरी केलेल्या तीन पीडितांनी आपली व्यथा पोलिसांना सांगितली. यामध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
मोहम्मद नूर नावाचा रोहिंग्या त्रिपुरातील सीमेवरून महिला आणि बालकांना देशात आणायचाा. त्यानंतर रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून त्यांना संबंधित ठिकाणांवर पोहोचवले जायचे, अशी माहिती उत्तरप्रदेशचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांतकुमार यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली. त्यानंतर त्यांची विक्री करण्यासाठी ही टोळी सक्रिय व्हायची. या प्रकरणी मोहम्मद नूर आणि रहमत या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यानंतर इतर सहा जणांना ताब्यात घेण्यात आले, असे त्यांनी सांगितले.
महिला-बालकांचे शोषण
अटक करण्यात आलेला आरोपी महिला व बालकांचे शारीरिक व आर्थिक शोषण करायचा. या माध्यमातून तो मोठ्या प्रमाणात पैसा कमवायचा. या टोळीची पाळेमुळे शोधून काढण्यासाठी पोलिस चौकशी करीत आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांतकुमार यांनी दिली.
घुसखोरीवर केंद्राने लोकसभेत दिली माहिती
म्यानमारमधील स्थिती आणि भारतात घुसखोरी करणार्या रोहिंग्यांबाबत केंद्र सरकारने लोकसभेत माहिती दिली. म्यानमारमधून होणार्या घुसखोरीबाबत केंद्राने मिझोरमसह चार राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मिझोरम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी होऊ शकते, अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर केंद्राने दिशादर्शक सूचना जारी केली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी उत्तरप्रदेश एटीएसने धर्मांतराचे सर्वांत मोठे आंतरराष्ट्रीय जाळे उद्ध्वस्त करून तीन सूत्रधारांना अटक केली होती. याप्रकरणाचे धागेदोरे नागपूरपर्यंत आढळून आले होते. घ(वृत्तसंस्था)
मुख्य आरोपी त्रिपुरातील
या प्रकरणात अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी मोहम्मद नूर हा त्रिपुराचा असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. पकडण्यात आलेल्या सहा जणांपैकी तीन जण पीडित, तर तीन आरोपी आहेत. आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, न्यायालयात हजर केले जाणार आहे. यातील महिलांना आशा केंद्रात पाठवले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. मोहम्मद नूर मूळचा बांगलादेशातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.