किमान तापमान : 24.69° से.
कमाल तापमान : 24.89° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 2.94 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.89° से.
24.27°से. - 28.58°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.07°से. - 29.1°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 28.81°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.93°से. - 29.28°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.59°से. - 28.72°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादल22.96°से. - 28.47°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलबंगळुरू, २७ जुलै – भाजपा विधिमंडळ पक्षाच्या आज मंगळवारी झालेल्या बैठकीत कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून बसवराज बोम्मई यांची एकमताने निवड करण्यात आली. उद्या बुधवारी सकाळी अकरा वाजता ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
केंद्रीय निरीक्षक म्हणून या बैठकीत केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी आणि धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते. बैठकीपूर्वी दोन्ही निरीक्षकांनी सर्व आमदारांच्या वेगवेगळ्या बैठका घेऊन त्यांचे मत जाणून घेतले. यानंतर येदीयुरप्पा आणि दोन्ही केंद्रीय निरीक्षक बैठक सुरू असलेल्या हॉटेलमध्ये आले. येदीयुरप्पा यांनी बसवराज बोम्मई यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि वरिष्ठ नेते जगदीश शेट्टर यांनी या प्रस्तावाचे अनुमोदन केले. यानंतर बैठकीत सर्वानुमते बोम्मई यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. भाजपाचे कर्नाटकचे प्रभारी अरुणसिंह हे देखील बैठकीत उपस्थित होते.
भाजपाने निर्धारित केलेल्या नियमानुसार, वयाची ७५ वर्षे पूर्ण करणार्या कोणत्याही नेत्याला सरकारमध्ये पदावर राहता येत नाही. या सिद्धांतानुसारच येदीयुरप्पा यांनी सोमवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. जनतेची सेवा करण्याची भाजपाने मला वारंवार दिली आणि यासाठी मी पक्षाचा व वरिष्ठ नेत्यांचा आभारी आहे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या होत्या.
माझ्यावर पक्षाने फार मोठी जबाबदारी सोपवली आहे. राज्यातील नागरिकांच्या हितासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आहे. लोकभिमुख सरकार देण्यावर माझा भर राहणार आहे, अशी प्रतिक्रिया बसवराज बोम्मई यांनी मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर पत्रपरिषदेत व्यक्त केली.