किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 25.42° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 3.03 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.99°से. - 28.15°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.65°से. - 28.75°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.74°से. - 28.47°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.32°से. - 29.01°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.06°से. - 28.38°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश23.5°से. - 28.34°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलआंतरराज्यीय सीमेवर तणावपूर्ण शांतता,
गुवाहाटी/सिलचर, २८ जुलै – आंतरराज्यीय सीमेवरील संभाव्य हिंसाचाराची भीती मिझोरमला असून, आसाममधील बराक खोर्यात आज बुधवारी बंद पुकारण्यात आला. आंदोलकांनी आसामच्या भागातच सर्व ट्रक रोखले असल्याने मिझोरमला होणारा पुरवठा थांबला आहे.
सोमवारी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झालेल्या सीमेवर तैनात करण्यात आलेले सशस्त्र पोलिस दोन्ही राज्यांनी किमान १०० मीटर आत बोलावले असून, सीमेवर शांतता प्रस्थापित व्हावी, या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले, असे दोन्ही राज्यांतील पोलिस अधिकार्यांनी सांगितले. सहा पोलिस कर्मचार्यांसह एकूण सात जणांच्या मृत्यूच्या निषेधार्थ १२ तासांचा बंद पुकारण्यात आल्याने आज बुधवारी आसाममधील बराक खोर्यातील तीन जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले.
मिझोरम-आसाम सीमेवर सोमवारी झालेल्या हिंसाचारात सात जणांच्या मृत्यू, तर पोलिस अधिकार्यासह ५० जण जखमी झाले आहेत. बराक खोर्यात आज पहाटे पाच वाजता सुरू झालेल्या बंदमुळे काचार, हैलाकांडी आणि करीमगंज जिल्ह्यातील व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती, तर वाहने रस्त्यांवरच अडकून पडली.
मात्र, या बंदचा रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही, अशी माहिती नॉर्थईस्ट फ्रन्टियर रेल्वेने दिली. हा बंद बराक डेमॉक्रॅटिक फ्रन्टियरने (बीडीएफ) आयोजित केला आणि त्याला एआययूडीएफसह राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला. हा बंद कडकडीत होता आणि हिंसाचाराचे कोणतेही वृत्त नसल्याची माहिती अधिकार्याने दिली.
नागरिकांनी या बंदला स्वयंस्फूर्तीने पाठिंबा दिला, असे बीडीएफचे प्रमुख संयोजक प्रदीप दत्ता राय यांनी सांगितले. आमच्या राज्यातील पोलिस कर्मचार्यांचा हिंसाचारात मृत्यू झाल्याने हा बंद पुकारण्यात आला. सीमावादावर कायमस्वरूपी तोडगा निघणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
काही सामाजिक संघटनांनी हैलाकांडी जिल्ह्यात रस्ते रोखून धरले. या माध्यमातून मिझोरममध्ये जाणारे ट्रक रोखून अनिश्चित काळासाठी या राज्याची आर्थिक नाकेबंदी सुरू करण्यात आली आहे.
वैभव निंबाळकरांवर शस्त्रक्रिया
मिझोरममधील समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेले मूळचे महाराष्ट्रातील काचारचे पोलिस अधीक्षक वैभव निंबाळकर यांना विमानाने मुंबईला हलविण्यात आले असून, त्यांच्यावर आज बुधवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. तीन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत त्यांच्या शरीरात घुसलेल्या गोळीचे तुकडे काढण्यात आले, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.