किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.65° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 3.29 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.99°से. - 28.52°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.69°से. - 28.91°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.85°से. - 28.87°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.96°से. - 28.66°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.35°से. - 28.38°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल22.91°से. - 28.26°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादलहिमाचलात मुसळधार पावसाचे चार बळी,
शिमला/जम्मू, २८ जुलै – जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात आज बुधवारी झालेल्या ढगफुटीमुळे ५ जण ठार झाले असून, २५ जण बेपत्ता झाले आहेत. १२ जणांना वाचविण्यात यश आले, तर हिमाचल प्रदेशातील कुल्लू, चांबा आणि लाहौल स्पिती येथे मुसळधार पावसाने आलेल्या भीषण पुरात चार जणांचा मृत्यू, तर अन्य ९ जण वाहून गेले आहेत.
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील होंझार या दुर्गम गावात आज सकाळी ढगफुटी झाली. यामुळे आलेल्या पुराच्या लाटेत ४२ लोक वाहून गेले. यातील पाच जणांचे मृतदेह सापडले असून, १२ जणांना वाचविण्यात आले. वाहून गेलेल्या अन्य २५ जणांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफसोबतच सुरक्षा दलांच्या जवानांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना फोन करून स्थितीचा आढावा घेतला. पोलिस महासंचालक दिलबागसिंग यांनाही अमित शाह यांनी फोन केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. वाचविण्यात आलेल्या १२ जणांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ढगफुटीमुळे आलेल्या पुरात सहा ते सात घरे वाहून गेली आहेत. या पुरात नेमके किती लोक वाहून गेले, याची आकडेवारी गोळा करण्यात येत असल्याची माहिती किश्तवाड जिल्ह्याचे विकास अधिकारी अशोककुमार शर्मा यांनी दिली.
दरम्यान, हिमाचलच्या कुल्लू, चांबा आणि लाहौल स्पिती या तीन जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. कुल्लू जिल्ह्यात दोघांचा, चांबा जिल्ह्यात दोघांचा आणि लाहौल स्पिती येथे एकाचा मृत्यू झाला आहे.
नऊ जण अजूनही बेपत्ता असून, त्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती राज्याच्या आपात् व्यवस्थापन विभागाचे संचालक सुदेशकुमार यांनी दिली.
स्थितीवर सरकारचे लक्ष : पंतप्रधान
ढगफुटीमुळे किश्तवाड आणि कारगिल येथे निर्माण झालेल्या पूरस्थितीवर केंद्र सरकारचे लक्ष असून, प्रभावित भागांपर्यंत आवश्यक ती सर्व मदत पोहोचविण्यात येत असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. प्रशासनाने मदत व बचाव कार्यावर भर द्यावा आणि बेपत्ता नागरिकांचा शोध घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली आहे.