किमान तापमान : 26.93° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 36 %
वायू वेग : 2.85 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
25.33°से. - 28.13°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.25°से. - 28.57°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.42°से. - 28.53°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.23°से. - 28.31°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.73°से. - 28.08°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल23.39°से. - 28.07°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादलजैशचे दोन अतिरेकी ठार, पुलवामा हल्ल्यात होता सहभागी,
श्रीनगर, ३१ जुलै – सुरक्षा दलाच्या जवानांनी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील एका भीषण चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरसह दोन अतिरेक्यांचा आज शनिवारी खात्मा केला. या कमांडरचे नाव इस्माल अल्वी उर्फ लंबू असे असून, तो जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरचा जवळचा नातेवाईक असल्याची माहिती पोलिस प्रवक्त्याने दिली.
पुलवामातील २०१९ च्या भीषण दहशतवादी हल्ल्यात लंबूचा सहभाग होता. त्यानेच या हल्ल्याचा कट तयार केला होता. तो आपल्या एका साथीदारासह दाचिगामच्या नामिबियान जंगलात आला असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्यानंतर लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांनी आज सकाळी संयुक्त मोहीम हाती घेतली. जवानांना पाहताच अतिरेक्यांनी गोळीबार केला. यावेळी ही चकमक झडली. यात दोन्ही अतिरेकी ठार झाले, असे प्रवक्त्याने सांगितले.
काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजयकुमार यांनीही या चकमकीची माहिती पत्रपरिषदेत दिली. लंबू हा पाकिस्तानी नागरिक असून, जैशची काश्मिरातील सूत्रे त्याच्याच हातात होती. तो मसूदचा पुतण्या होता. त्याचा खात्मा हे आमचे सर्वांत मोठे यश आहे. पुलवामा हल्ल्याचा तो मुख्य सूत्रधार होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान हुतात्मा झाले होते. शिवाय, इतर अनेक हल्ल्यांमध्येही तो सहभागी होता. एनआयएने पुलवामा हल्ल्याप्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रातही त्याचे नाव होते. दुसर्या अतिरेक्याची ओळख अद्याप पटलेली नाही, असे ते म्हणाले.
फिरोझपूर सीमेवर दोन पाकिस्तानी घुसखोर ठार
चंदीगढ : पंजाबमधील फिरोझपूर जिल्ह्यातल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर दोन पाकिस्तानी घुसखोरांना ठार केल्यानंतर सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) या परिसरात शोधमोहीम उघडली आहे. पाकिस्तानी घुसखोरांना शुक्रवारी ठार करण्यात आल्याच्या वृत्तास बीएसएफने दुजोरा दिला आहे. भारतीय हद्दीत घुसखोरी होत असल्याचे फिरोझपूरमधील ठेकलन परिसरात तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांना शुक्रवारी रात्री ८.४८ वाजताच्या सुमारास आढळले होते. या घुसखोरांना परतण्याचे आवाहन बीएसएफच्या पथकाने केले. मात्र, सातत्याने इशारा देऊनही ते भारतीय हद्दीत घुसखोरी करीत असल्याने गोळीबार करावा लागला.
जम्मू-काश्मिरात एनआयएची छापेमारी
जम्मू-काश्मिरात २७ जून रोजी जप्त करण्यात आलेल्या पाच किलोच्या आयईडी प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएने आज शनिवारी १४ ठिकाणी छापेमारी करीत लष्कर-ए-मुस्तफा अतिरेकी संघटनेच्या हिदायतउल्लाह मलिक नावाच्या अतिरेक्याला अटक केली.
एनआयएने १४ ठिकाणी छापेमारी केली. यात शोपियॉंमधील ६ ठिकाणे, अनंतनागमधील चार, बनिहाल येथील दोन आणि जम्मूतील संजुवान येथील दोन ठिकाणांचा समावेश आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी २७ जून रोजी जम्मूतील नरवाल येथे कारवाई करीत दोन अतिरेक्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून आयईडी जप्त केले होते. नदीम अयूब राथर आणि तालिब उर्र रहमान अशी या दोन अतिरेक्यांची नावे असून, ते अनुक्रमे शोपियॉं व बनिवाल येथील रहिवासी आहेत. जम्मूतील वायुतळावर झालेल्या स्फोटानंतर या दोघांना अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान नदीमने आणखी दोन अतिरेक्यांची माहिती दिली. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. जम्मूतील प्रार्थनास्थळांवर हल्ला करण्याचा कट त्यांनी रचला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. काही दिवसांनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग केला.
लष्कर-ए-मुस्तफा ही जैश-ए-मोहम्मदची काश्मिरातील उपसंघटना आहे. त्याचा प्रमुख हिदायतउल्लाह याला ६ फेब्रुवारी रोजी जम्मूतून अटक करण्यात आली होती. या संघटनेने जम्मू-काश्मिरात मोठे हल्ले करण्याचा कट रचला होता, अशी माहिती एनआयएने दिली.