किमान तापमान : 27.32° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 35 %
वायू वेग : 3.29 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
24.55°से. - 30.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.97°से. - 28.27°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.86°से. - 29.14°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.71°से. - 28.32°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.78°से. - 27.76°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.41°से. - 27.59°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलअमरिंदरसिंगांचा गट पडला कमजोर,
चंदीगड, २१ जुलै – पंजाब कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी आज बुधवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत अमृतसरच्या सुवर्ण मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पक्षातील ६० पेक्षा जास्त आमदार उपस्थित होते. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यापेक्षा आपल्याकडे जास्त संख्याबळ आहे, हे दाखवितानाच, अमरिंदरसिंग यांची माफी मागण्यासही त्यांनी नकार दिला.
मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी सिद्धू यांना सार्वजनिक रीत्या आपली माफी मागण्याचा आदेश दिला होता. मात्र, सिद्धू यांनी माफी मागण्यास नकार दिल्याने, ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉंगे्रसपुढे नवीन संकट उभे राहण्याची शक्यता आहे.
पंजाबमध्ये मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होत. मात्र, त्या आधीच पंजाब कॉंग्रेसमध्ये कलह सुरू झाला.
पक्षातील अंतर्गत कलह मिटावा, यासाठी पक्षश्रेष्ठींनी अमरिंदरसिंग यांचा विरोध असतानाही नवज्योतसिंग सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष केले. अध्यक्ष होताच सिद्धू यांनी कॉंग्रेसच्या बहुतांश आमदार आणि मंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना आपल्या बाजूने वळविले. आज त्यांच्यासोबत पक्षातील ६० पेक्षा जास्त आमदार उपस्थित होते, यावरून सिद्धूंनी पक्षात आपले वर्चस्व सिद्ध केल्याची चर्चा आहे.
सिद्धू यांनी सुवर्ण मंदिराचे दर्शन घेतले. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर गर्दी करण्यास परवानगी नसतानाही सिद्धू यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याचे दिसून आले आहे. सिद्धू यांच्या टीकेमुळे आपली प्रतिमा डागाळली असल्याने, सिद्धू यांनी जाहीरपणे आपली माफी मागावी, अशी भूमिका अमरिंदरसिंग यांनी घेतली, आपण माफी मागणार नसल्याचे सिद्धू यांनी स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले.