किमान तापमान : 24.99° से.
कमाल तापमान : 26.04° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 2.28 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
24.85°से. - 28.15°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.65°से. - 28.75°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.74°से. - 28.47°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.32°से. - 29.01°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.06°से. - 28.38°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश23.5°से. - 28.34°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलसिद्धूंना मात्र डावलले; पंजाबमध्ये धुसफूस सुरूच,
चंदीगढ, १९ जुलै – पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदी कॉंग्रेसने नवज्योतसिंग सिद्धू यांना नियुक्त केले असले, तरी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांची आक्रमकता कायम आहे. नवज्योतसिंग सिद्धू वगळता पक्षातील अन्य नेत्यांना अमरिंदरसिंग यांनी भोजनाचे निमंत्रण दिले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अमरिंदरसिंग यांनी पंचकुला येथे हा भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. याचे निमंत्रण त्यांनी पक्षाचे सर्व आमदार आणि खासदारांना दिले. मात्र, नवज्योतसिंग सिद्धू यांना निमंत्रण दिलेले नाही.
पंजाब कॉंग्रेसमध्ये उफाळलेल्या असंतोषानंतर वरिष्ठ नेत्यांनी सिद्धू यांना रविवारी रात्री प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे सोपविली. सिद्धू यांच्यासोबत चार कार्याध्यक्षांची देखील नियुक्ती करण्यात आली. परंतु, अमरिंदरसिंग यांनी अद्याप सिद्धू यांचे अभिनंदन केलेले नाही.
प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त केल्याची घोषणा झाल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी ट्विटरवर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले. मात्र, त्यात अमरिंदरसिंग यांच्या नावाचा उल्लेख त्यांनी केला नाही. सिद्धू आणि अमरिंदरसिंग यांच्यातील तणाव अद्यापही संपुष्टात आलेला नसल्याचे या माध्यमातून स्पष्ट झाले आहे.
प्रदेशाध्यक्षपदावर नियुक्ती झाल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू कामाला लागले आहेत. त्यांनी सर्वप्रथम गुरुद्वारात जाऊन आशीर्वाद घेतला. त्यानंतर आपल्या नवीन चमूची भेट घेतली. आज सकाळी त्यांनी नवीन कार्याध्यक्षांची भेट घेऊन चर्चा केली.
नवीन प्रदेशाध्यक्षाची घोषणा करण्यापूर्वी कॉंग्रेसला दीर्घकाळ पक्षातील असंतोषाचा सामना करावा लागला आहे. अमरिंदरसिंग यांनी सातत्याने सिद्धू यांचा विरोध केला आणि त्यांच्या समर्थकांनी सातत्याने बैठका घेतल्या; सोबतच कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र देखील पाठवले. मात्र, अमरिंदरसिंग यांच्या नाराजीकडे दुर्लक्ष करीत कॉंग्रेसच्या नेतृत्वाने नवज्योतसिंग सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपद दिले. याचा नेमका कोणता परिणाम पंजाबच्या राजकारणावर पडेल, हे काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.