किमान तापमान : 25.21° से.
कमाल तापमान : 25.73° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 2.3 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.73° से.
24.11°से. - 28.99°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.75°से. - 28.8°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर घनघोर बादल24.78°से. - 28.5°से.
रविवार, 24 नोव्हेंबर कुछ बादल25.03°से. - 28.91°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.82°से. - 29.26°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.38°से. - 28.68°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादलदहा आमदारांचा पक्षश्रेष्ठींना इशारा,
चंदीगड, १८ जुलै – मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांचा अपमान करू नका. त्यांच्यामुळेच पंजाबमध्ये कॉंगे्रसची सत्ता आहे, याचा विसर होऊ देऊ नका, असा अप्रत्यक्ष इशारा पंजाब कॉंगे्रसमधील दहा आमदारांनी आज रविवारी पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिला आहे.
१९८४ पासून अमरिंदरसिंग हेच शिखांचे नेते आहे. त्यांच्या लोकप्रियतेमुळे राज्यात कॉंगे्रसचे अस्तित्व आहे. त्यांचा अपमान हा संपूर्ण शिखांचा अपमान आहे, असे संयुक्त निवेदन या आमदारांनी एका पत्रपरिषदेतून जारी केले.
बाहेरून आलेल्या एका नेत्याकरिता आपण अमरिंदरसिंगांचा अपमान केलेला कदापि मान्य होणार नाही. याचे गंभीर परिणाम आपल्याला पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत भोगावे लागतील. कारण, पंजाबमधील जनता फक्त अमरिंदरसिंग यांच्यामुळेच कॉंगे्रसच्या पाठीशी आहे. त्यांच्या नेतृत्वाला वारंवार आव्हान देणार्या नवज्योतसिंग सिद्धू यांनी अमरिंदरसिंग यांची जाहीर माफी मागावी, असेही या आमदारांनी सांगितले.
सर्व आमदारांची आज बैठक
दरम्यान, पंजाब प्रदेश कॉंगे्रसचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी सर्व आमदार आणि जिल्हा प्रमुखांची उद्या सोमवारी बैठक बोलावली आहे. राज्यात काही महिन्यांवरच विधानसभेची निवडणूक होणार असल्याने, पक्षात सुरू असलेला कलह घातक ठरू शकतो. त्यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.