किमान तापमान : 27.32° से.
कमाल तापमान : 31.94° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 35 %
वायू वेग : 3.29 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.94° से.
24.55°से. - 31.94°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.97°से. - 28.27°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.86°से. - 29.14°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.71°से. - 28.32°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.78°से. - 27.76°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.41°से. - 27.59°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलमुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर अमरिंदरसिंगांचा हल्लाबोल,
पंजाबसाठी आपत्ती ठरतील सिद्धू,
इम्रान खान व बाजवाशी संबंध,
मुख्यमंत्री केल्यास विरोध करणार,
पक्षाला जो घ्यायचा आहे तो निर्णय घ्यावा,
सर्व राजकीय पर्याय खुले असल्याची स्पष्टोक्ती,
चंदीगड, १८ सप्टेंबर – अतिशय संघर्षपूर्ण घडामोडीत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी आज शनिवारी सायंकाळी पदाचा राजीनामा दिला. कॉंगे्रसमध्ये आलेल्या या राजकीय भूकंपासाठी कारणीभूत ठरणार्या घडामोडी आज सकाळपासूनच वेगाने सुरू झाल्या होत्या. सायंकाळी या भूकंपाने केवळ पंजाबच नव्हे, तर दिल्लीही हादरले. राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदरसिंग यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर घणाघाती हल्ला चढविला. सिद्धू यांचे थेट पाकिस्तानशी संबंध असून, पंतप्रधान इम्रान खान आणि लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा हे त्यांचे जवळचे मित्र आहेत. सिद्धू यांच्याकडे मुख्यमंत्रिपद देणे पंजाबसाठी मोठी आपत्ती ठरेल, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
मी आता राजीनामा दिला असून, भविष्यातील सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. यापुढे पक्षाला जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो त्यांनी खुशाल घ्यावा. मात्र, सिद्धू यांना मुख्यमंत्री केल्यास सर्वप्रथम मी विरोध करेल, असे त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. राजीनामा देण्यापूर्वी कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांना कल्पना दिली असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मी सरकार चालवण्यास सक्षम नाही, असा ठपकाच ठेवण्यात आला. माझ्या कतृत्वावर संशय घेण्यात आला. दोन महिन्यात तीन वेळा मला दिल्लीला बोलावण्यात आले होते. मला स्पष्टीकरण मागण्यात आले. माझा अपमान करण्यात आला. माझे सर्वच पर्याय खुले आहेत, त्यावर विचार केला जाईल. समर्थकांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. राजीनामा देण्यापूर्वी अमरिंदरसिंग यांनी आपल्या समर्थक आमदारांसोबत बैठक घेतली. त्यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला.
पंजाबमध्ये पाकी शस्त्र येतात
नवज्योतसिंग सिद्धूंचे पाकिस्तानमधील नेत्यांशी चांगले आणि मैत्रिपूर्ण संबंध आहेत. याच पाकिस्तानातून पंजाबमध्ये शस्त्र आणि मादकपदार्थ येत असतात. सिद्धूंच्या हातात पंजाबची सूत्रे सोपविल्यास या राज्यावर मोठी आपत्ती आल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. जी व्यक्ती आपले मंत्रालय व्यवस्थित चालवू शकत नाही, ती राज्य काय चालविणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत दोन निर्णय
कॉंगे्रस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आज दोन निर्णय घेण्यात आले. सूत्रांच्या मते, या बैठकीत ७९ आमदार उपस्थित होते. अजय माकन व हरीश रावत केंद्रीय निरीक्षक होते. या बैठकीत दोन प्रस्ताव पारित करण्यात आले. यातील मुख्य प्रस्ताव म्हणजे,
नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्याचा अधिकार सोनिया गांधी यांच्याकडे सोपविण्यात आला. मुख्यमंत्रिपदावरून कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी केलेल्या कामाचा कौतुक करणारा प्रस्तावही बैठकीत पारित करण्यात आला. अमरिंदरसिंग यांनी पंजाबसाठी अतिशय चांगले काम केल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे.
अपमान सहन करून पक्षात राहू शकत नाही
आतापर्यंत झाला तो अपमान बस झाला, यापुढे असा अपमान सहन करीत कॉंग्रेसमध्ये राहू शकत नाही, अशी भूमिका त्यांनी विशद केली, असे त्यांनी आज सकाळी सोनिया गांधी यांना फोन करून सांगितले.
४० आमदारांचा कॅप्टनविरोधात उठाव
तत्पूर्वी आज सकाळी कॉंगे्रसमधील ४० आमदारांनी कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याविरोधात उठाव करीत, नेतृत्वबदलाची मागणी केली. पक्षात निर्माण झालेली बंडखोरी लक्षात घेऊन सोनिया गांधी यांनी सायंकाळी पाच वाजता विधिमंडळ पक्षाची तातडीची बैठक बोलावली. मात्र, अमरिंदरसिंग आणि त्यांचे समर्थक आमदार या बैठकीला अनुपस्थित राहिले. या बैठकीपूर्वीच त्यांनी पदाचा राजीनामा दिला.