किमान तापमान : 26.96° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 45 %
वायू वेग : 5.33 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
23.94°से. - 29.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.38°से. - 28.63°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.28°से. - 29.45°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.43°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.15°से. - 28.01°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.72°से. - 27.96°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलआसाम विदेशी लवादाचा निर्णय,
गुवाहाटी, २० सप्टेंबर – देशाच्या रजिस्ट्रार जनरलने अधिसूचित केले नसले, तरी ऑगस्ट २०१९ मध्ये प्रकाशित करण्यात आलेले राष्ट्रीय नागरिकता रजिस्टर अर्थात् एनआरसी ही अंतिम असल्याचा निर्णय आसाममधील विदेशी लवादाने दिला आहे.
राष्ट्रीय ओळखपत्रे अद्याप वितरित करण्यात आले नसले, तरी ऑगस्ट २०१९ मध्ये प्रकाशित करण्यात आलेली एनआरसी ही अंतिम आहे, असे विदेशी लवादाने करिमगंज येथील एका व्यक्तीला देशाचे नागरिकत्व बहाल करताना म्हटले. करिमगंज जिल्ह्याच्या पथेरकांदी पोलिस ठाणे हद्दीतील जामिराला गावातील विक्रम सिंघा या संशयित मतदाराच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणामध्ये करिमगंज येथील विदेशी लवादाचे सदस्य शिशिर डे यांनी हा निर्णय दिला आहे. बेकायदेशीर निर्वासित कायदा-१९९९ अंतर्गत दाखल करण्यात आलेले हे पहिलेच प्रकरण होते.
सर्वोच्च न्यायालयाने २००५ साली बेकायदेशीर निर्वासित कायदा-१९९९ रद्द केल्यानंतर हे प्रकरण करिमगंज येथील विदेशी लवादात २००७ मध्ये वर्ग करण्यात आले आणि शेवटी २०१७ मध्ये विदेशी लवादात हे प्रकरण वर्ग करण्यात आले. या वर्षी १ सप्टेंबर रोजी या प्रकरणी सुनावणी करण्यात आली.
याबाबतचा अंतिम निर्णय आणि लवादाचे मत १० सप्टेंबर रोजी जारी करण्यात आले. सिंघा यांच्या नावाचा समावेश एनआरसीच्या अंतिम मसुद्यात करण्यात आला असून, कुटुंबातील इतर सदस्यांसोबत असलेले नाते यात सिद्ध झाले आहे, असे विदेशी लवादाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.