किमान तापमान : 26.96° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 45 %
वायू वेग : 5.33 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
23.94°से. - 29.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.38°से. - 28.63°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.28°से. - 29.45°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.43°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.15°से. - 28.01°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.72°से. - 27.96°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलसर्वच जुन्या मंत्र्यांना नारळ,
गांधीनगर, १६ सप्टेंबर – पुढील वर्षी गुजरातमध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाचा चेहरामोहरा बदलला जाणार असल्याचे संकेत देत आज गुरुवारी गुजरात मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. आज २४ नव्या मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यात समावेश असलेले २१ जण पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत. सर्वच जुन्या मंत्र्यांना नारळ देण्यात आला आहे.
मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या विस्तारानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वातील मंत्र्यांची संख्या २५ झाली आहे. राजभवन येथे आज दुपारी १.३० वाजताच्या सुमारास झालेल्या सोहळ्यात विधानसभेचे माजी अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी आणि माजी प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांनीदेखील शपथ घेतली. नवीन मंत्रिमंडळात विजय रुपाणी यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळातल्या एकाही मंत्र्याला स्थान देण्यात आलेले नाही.
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी १० कॅबिनेट आणि १४ राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात स्वतंत्र प्रभार असलेल्या पाच राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. गुजरातचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून सोमवारी शपथ घेतलेले भूपेंद्र पटेल राजभवन येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यासाठी माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह उपस्थित होते.
कॅबिनेट मंत्री : राजेंद्र त्रिवेदी, जितू वाघानी, ऋषिकेश पटेल, पूर्णेश मोदी, राघवजी पटेल, कानुभाई देसाई, कीर्तिसिंह राणा, नरेश पटेल, प्रदीप परमान आणि अर्जुनसिंह चौहान यांचा समावेश कॅबिनेट मंत्री म्हणून करण्यात आला आहे. यातील राजेंद्र त्रिवेदी आणि राघवजी पटेल यांनी यापूर्वी मंत्रिपद भूषवले आहे.
राज्यमंत्री : मुकेश पटेल, निमिशा सुथार, अरविंद रयानी, कुबेर दिंडोर, किर्तिसिंह वाघेला, गजेंद्रसिंह परमार, आर. सी. मकवाना, विनोद मोराडिया आणि देवा मालम यांना राज्य मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.
विधानसभेच्या अध्यक्षपदी निमा आचार्य
गुजरातमध्ये मुख्यमंत्री आणि मंत्रीच नव्हे, तर विधानसभा अध्यक्षदेखील बदलण्यात आले. २०१७ पासून विधानसभा अध्यक्षपद सांभाळणारे राजेंद्र तिवारी यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. शपथविधीपूर्वी त्यांनी आजच पदाचा राजीनामा दिला. राजेंद्र तिवारी यांच्याजागी निमा आचार्य यांना विधानसभेचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. आचार्य यांनीदेखील आज अध्यक्षपदाची शपथ घेतली.