|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:39 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.05° से.

कमाल तापमान : 27.68° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 57 %

वायू वेग : 4.91 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

27.68° से.

हवामानाचा अंदाज

24.55°से. - 27.99°से.

सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.91°से. - 28.4°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.68°से. - 28.77°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.68°से. - 28.73°से.

गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

24.16°से. - 28.59°से.

शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.07°से. - 27.85°से.

शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादल
Home » उत्तर प्रदेश, राज्य » लखनौत पावसाचा हाहाकार

लखनौत पावसाचा हाहाकार

रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, वस्त्याही जलमय,
लखनौ, १६ सप्टेंबर – राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून, लखनौ आणि इटावा शहरात पावसाने जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. लखनौमध्ये पावसाच्या हाहाकारामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले, तर वस्त्याही जलमय झाल्या आहेत. रस्ते पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.
उत्तरप्रदेशची राजधानी लखनौमध्ये मागील काही तासांपासून संततधार कोसळत असून, संपूर्ण जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. शहरातील गोमतीनगर, हजरतगंज, ठाकूरगंज, आलमबाग, इंदिरानगर या भागांतील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. पाऊस सुरूच असल्याने स्थानिक प्रशासन आणि पोलिस आयुक्त डी. के. ठाकूर यांनी लोकांना घराबाहेर न पडल्याचे आवाहन केले आहे. याशिवाय जिल्हा दंडाधिकारी अभिषेक प्रकाश यांनीही लोकांनी घरातच राहण्याची सूचना केली आहे. लोकवस्तीत अनेक ठिकाणी आणि रस्त्यांतही झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सातत्याने पाऊस सुरू असल्याने अनेक घरांत पाणी शिरले. त्यामुळे महानगरपालिकाच्या वतीने ४८ पम्पिंग स्टेशन सुरू करण्यात आले आहेत. रस्त्यांत आणि घरांवर पडलेल्या झाडांची आणि विद्युत खांबांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, व्यवस्थापन विभागाकडून तीव्र गतीने कामे करण्यात येत असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त अजय द्विवेदी यांनी दिली.
मुसळधार पावसाने लखनौमधील अनेक रस्ते खचले असून, बहुतांश भागातील वाहतूक थांबली आहे. भरीस भर काही ठिकाणी अपघातही झाल्याने स्थानिक प्रशासनाने कारणाशिवाय वाहनासह घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे.
अमेठीतील शासकीय कार्यालयांत पाणी
अमेठी शहरात मागील २४ तासांपासून मुसळाधार पाऊस पडत असून, अनेक सरकारी कार्यालयांत पाणी शिरल्याने कामकाज ठप्प झाले आहे. एसडीएम निवास्थान, मुख्याधिकारी निवासस्थान परिसर, एसडीएम कॉलनी, केशवनगर यासह अनेक भागांत पाणी साचले आहे. शहरातील चौधराना मोहल्ल्यात भिंत कोसळून सात वर्षीय बालिकाचा मृत्यू झाल्याचे समजते.
राज्यात चार जणांचा मृत्यू
राज्यातील सुलतानपूर येथेही ४८ तासांपासून पाऊस सुरू असून, जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी भिंत पडल्याने तीन बालिकांचा आणि ललौनी ठाण्याअंतर्गत जजरहा गावात राकेश नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. एक दाम्पत्य गंभीर जखमी झाल्याचे अग्निशमन विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.
रेल्वेसेवाही थांबली
इटावामध्ये वादळी वारे आणि पावसामुळे रेल्वेगाड्यांना वीजपुरवठा करणार्‍या तारांवर झाडे कोसळल्याने दिल्ली-हावडा मार्ग बंद झाला असून, जोधपूर एक्सप्रेस, नीलांचल एक्सप्रेस, कालका एक्सप्रेस अशा अनेक गाड्या थांबवण्यात आल्या.

Posted by : | on : 17 Sep 2021
Filed under : उत्तर प्रदेश, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g