|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:39 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 26.96° से.

कमाल तापमान : 30.28° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 43 %

वायू वेग : 5.33 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

30.28° से.

हवामानाचा अंदाज

23.94°से. - 31.94°से.

सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.38°से. - 28.63°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.28°से. - 29.45°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.43°से. - 28.72°से.

गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.15°से. - 28.01°से.

शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.72°से. - 27.96°से.

शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादल

मुख्यमंत्री चन्नींच्या भावाचा भाजपात प्रवेश

मुख्यमंत्री चन्नींच्या भावाचा भाजपात प्रवेशचंदीगड, १२ जानेवारी – पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्या भावाने आज बुधवारी भाजपात प्रवेश केला. ही घडामोड पुन्हा सत्तेत येण्याचे स्वप्न रंगवत असलेल्या कॉंगे्रसला मोठा हादरा देणारी आहे. त्यांच्या प्रवेशामुळे राज्यात भाजपाची ताकद आणखी वाढणार आहे. मुख्यमंत्री चन्नी यांचे चुलत बंधू जसविंदरसिंग धालिवाल यांनी भाजपात प्रवेश केला. केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासह काही वरिष्ठ नेत्यांनी धालिवाल यांचे स्वागत केले. त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे पंजाबच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धालिवाल यांचे...12 Jan 2022 / No Comment / Read More »

भाजपा, पंजाब लोक कॉंग्रेस, शिअद एकत्र लढणार

भाजपा, पंजाब लोक कॉंग्रेस, शिअद एकत्र लढणारनवी दिल्ली, २७ डिसेंबर – पंजाबमध्ये भाजपा, कॅप्टन अमरिंदरसिंग यांची पंजाब लोक कॉंग्रेस आणि सुखदेवसिंग धिंडसा यांच्या नेतृत्वातील शिरोमणी अकाल दल (संयुक्त) एकत्रितपणे निवडणूक लढणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री आणि पंजाब भाजपाचे प्रभारी गजेंद्र शेखावत यांनी आज केली. हे तिन्ही पक्ष लवकरच आपले संयुक्त घोषणापत्र जारी करतील, असे ते म्हणाले. पंजाबमधील विधानसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेबाबत अमरिंदरसिंग आणि धिंडसा यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी भाजपाचे...27 Dec 2021 / No Comment / Read More »

लुधियाना स्फोटात बब्बर खालसाचा हात; सूत्रधार पाकिस्तानमध्ये

लुधियाना स्फोटात बब्बर खालसाचा हात; सूत्रधार पाकिस्तानमध्येचंदीगड, २५ डिसेंबर – लुधियाना येथील जिल्हा व सत्र न्यायालयात गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात कुख्यात गुंड हरविंदरसिंग उर्फ रिंदासिंगचे नाव समोर आले. या हल्ल्याचा सूत्रधार असलेला रिंदा पाकिस्तानमध्ये असल्याची माहिती आहे. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि पोलिसांनी स्फोटात ठार झालेल्या गगनदीपसिंगच्या घराची झडती घेतली. पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गगनदीपच्या घराची झडती घेतली. त्याच्या घरातून लॅपटॉप, मोबाईल आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. गगनदीप हा माजी हेड कॉन्स्टेबल होता, त्याला २०१९...25 Dec 2021 / No Comment / Read More »

स्फोटाने हादरले लुधियाना

स्फोटाने हादरले लुधियानान्यायालयात दुसर्‍या मजल्यावर घडली घटना, लुधियाना, २३ डिसेंबर – जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीत झालेल्या स्फोटामुळे आज गुरुवारी लुधियाना हादरले. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला तर, चार जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. न्यायालयीन इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील स्वच्छतागृहात हा स्फोट झाला, असे पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले. स्फोट झाला त्यावेळी न्यायालयाचे कामकाज सुरू होते. स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी न्यायालयीन इमारतीला वेढा घालून बचाव मोहीम सुरू केली. स्फोटाची भीषणता लक्षात घेता मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या...23 Dec 2021 / No Comment / Read More »

अमरिंदर-ढिंडसांसोबत युतीसाठी चर्चा

अमरिंदर-ढिंडसांसोबत युतीसाठी चर्चानवी दिल्ली, ४ डिसेंबर – पंजाब विधानसभा निवडणुकीत युती करण्यासाठी पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि शिरोमणी अकाली दलाचे माजी नेते सुखदेव ढिंडसा यांच्यासोबत भाजपा चर्चा करीत आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज शनिवारी दिली. कृषी कायदे रद्द करण्यात आले असून, शेतकरी आंदोलनाचा कोणताही परिणाम पंजाब आणि उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीवर पडण्याची शक्यता अमित शाह यांनी एका कार्यक्रमात फेटाळली. सहजपणे बहुमत मिळवून भाजपा उत्तरप्रदेशात पुन्हा एकदा सरकार स्थापन करेल,...4 Dec 2021 / No Comment / Read More »

मनजिंदरसिंग सिरसा यांचा भाजपात प्रवेश

मनजिंदरसिंग सिरसा यांचा भाजपात प्रवेशनवी दिल्ली, १ डिसेंबर – शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनजिंदरसिंग सिरसा यांनी येथे आज बुधवारी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि गजेंद्रसिंह शेखावत यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. पुढील वर्षी पंजाबमध्ये अपेक्षित असलेल्या विधानसभा निवडणुकीत सिरसा यांची उपयुक्त भूमिका असेल, असे यावेळी पंजाबचे प्रभारी शेकावत यांनी सांगितले. सिरसा हे अकाली दलातील दिल्लीचे महत्त्वाचे नेते होते. त्यांनी तीन कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाला पाठिंबा दिला होता....1 Dec 2021 / No Comment / Read More »

शीख, हिंदूंमध्ये हिंसाचार घडवण्याचा कट

शीख, हिंदूंमध्ये हिंसाचार घडवण्याचा कटपंतप्रधान मोदी यांनी कृषी कायदे रद्द करून उधळली योजना श्री अकाल तख्तचा दावा चंदीगड, २१ नोव्हेंबर – तीन कृषी कायद्यांच्या विरोधासाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या आड शीख आणि भारत सरकारमधील संघर्ष पेटवण्याचा तसेच शीख व हिंदूंमध्ये हिंसाचार घडवण्याचा कट रचण्यात आला होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळीच कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेऊन हा कट उधळला, असा दावा श्री अकाल तख्त साहिबचे जत्थेदार ज्ञानी हरप्रीतसिंग यांनी केला आहे. वेळीच...22 Nov 2021 / No Comment / Read More »

पंजाब महाधिवक्त्यांची सिद्धू यांच्यावर टीका

पंजाब महाधिवक्त्यांची सिद्धू यांच्यावर टीकाचंदीगड, ७ नोव्हेंबर – आपल्या राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी कॉंग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू हे चुकीची माहिती पसरवित आहेत. शिवाय राज्य सरकार व महाधिवक्त्यांच्या कामात अडथळे आणत आहेत, असा आरोप पंजाबचे महाधिवक्ता एपीएस देओल यांनी केला. सिद्धू यांनी काही दिवसांपूर्वी पंजाब कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता व आता तो त्यांनी मागे घेतला आहे, मात्र राज्य सरकारने पोलिस महासंचालक साहोटा व महाधिवक्ता देओल यांच्या जागी अन्य व्यक्तींची नियुक्ती केली, तरच आपण प्रदेशाध्यक्षपदाचा...7 Nov 2021 / No Comment / Read More »

चन्नींच्या कामकाजावर नवज्योतसिंग सिद्धू भडकले

चन्नींच्या कामकाजावर नवज्योतसिंग सिद्धू भडकलेचंदीगड, ६ नोव्हेंबर – कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेताच नवज्योतसिंग सिद्धू यांनी मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. सत्तेत येऊन चन्नी यांना ५० दिवसांचा कालावधी लोटला आहे. या काळात त्यांनी नेमके काय केले. एसटीएफचा ड्रग्जसंदर्भातील अहवाल सार्वजनिक करण्यात उशीर का होत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सिद्धू यांनी २८ सप्टेंबर रोजी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, केंद्रीय नेत्यांच्या दबावापुढे नमते घेत त्यांनी शुक्रवारी राजीनामा मागे घेतला. आज सकाळी...6 Nov 2021 / No Comment / Read More »

अमरिंदरसिंग यांचा कॉंग्रेसला रामराम; पंजाब लोक कॉंग्रेसची केली स्थापना

अमरिंदरसिंग यांचा कॉंग्रेसला रामराम; पंजाब लोक कॉंग्रेसची केली स्थापनाचंदीगड, २ नोव्हेंबर – पंजाबच्या विधानसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी कॉंग्रेसचा राजीनामा देत आज मंगळवारी पंजाब लोक कॉंग्रेस या नवीन पक्षाची घोषणा केली. पक्षाची औपचारिक सुरुवात नंतर केली जाईल. निवडणूक आयोगाला या नावावर आक्षेप नसल्याचे त्यांनी सांगितले. कॉंग्रेससोबत पडद्याआड वाटाघाटी सुरू असल्याचा दावा फेटाळत कॉंग्रेससोबत पुन्हा जुळण्याची वेळ गेली, असे त्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकारांसोबत चर्चा करताना स्पष्ट केले होते. त्यानंतर आज नवीन पक्षाच्या नावाची...2 Nov 2021 / No Comment / Read More »

अमरिंदरसिंग यांनी केली नवीन पक्षाची घोषणा

अमरिंदरसिंग यांनी केली नवीन पक्षाची घोषणानाव लवकरच कळणार, चंदीगड, २७ ऑक्टोबर – पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी आज बुधवारी येथे नवीन पक्षाची घोषणा केली. निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर पक्षाच्या नावाची आणि चिन्हाची माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. लवकरच स्वतःचा नवीन पक्ष स्थापन करणार आहे. तीन कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर तोडगा निघाल्यावर भाजपासोबत जागावाटप होण्याची अपेक्षा आहे, असे त्यांनी मागील आठवड्यात सांगितले होते. मी नवीन पक्ष स्थापन करीत आहे. मात्र, त्याचे नाव...27 Oct 2021 / No Comment / Read More »

बीएसएफच्या अधिकारक्षेत्रावरून पंजाब कॉंगे्रसमध्ये वाद

बीएसएफच्या अधिकारक्षेत्रावरून पंजाब कॉंगे्रसमध्ये वादपश्‍चिम बंगालचाही झाला जळफळाट, चंदीगड, १४ ऑक्टोबर – केंद्रीय गृह मंत्रालयाने पंजाबसह देशभरातील सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) अधिकारक्षेत्रात वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावरून पंजाब कॉंग्रेसमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. पश्‍चिम बंगाल सरकारनेही या निर्णयावर आक्षेप घेत, आमच्या अधिकारांमध्ये केंद्राचा हा अनावश्यक हस्तक्षेप असल्याचे या सरकारने म्हटले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे कॉंग्रेसचे नेते व पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी स्वागत केले, तर विद्यमान मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी...14 Oct 2021 / No Comment / Read More »