किमान तापमान : 30.79° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 0.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.34°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशपंतप्रधान मोदी यांनी कृषी कायदे रद्द करून उधळली योजना
श्री अकाल तख्तचा दावा
चंदीगड, २१ नोव्हेंबर –
तीन कृषी कायद्यांच्या विरोधासाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या आड शीख आणि भारत सरकारमधील संघर्ष पेटवण्याचा तसेच शीख व हिंदूंमध्ये हिंसाचार घडवण्याचा कट रचण्यात आला होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळीच कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेऊन हा कट उधळला, असा दावा श्री अकाल तख्त साहिबचे जत्थेदार ज्ञानी हरप्रीतसिंग यांनी केला आहे. वेळीच कृती करीत मोठा हिंसाचार टाळल्याबद्दल भारत सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे त्यांनी चित्रफीत जारी करीत आभार मानले आहेत.
कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने एक मोठे राष्ट्रीय संकट टाळले आहे. या आंदोलनातील काही गट शिखांचा विचार, त्यांचे निशाण, उद्देश, इतिहास आणि भावनांकडे दुर्लक्ष करीत होते. यामुळे भविष्यात होणारे नुकसान या माध्यमातून टाळण्यात आले आहे, असे हरप्रीतसिंग यांनी सांगितले. पंजाबपासून सुरू झालेल्या या आंदोलनाची व्याप्ती आता इतर राज्यांमध्येही वाढली आहे. त्यामुळे हरप्रीतसिंग यांनी केलेले वक्तव्य अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी तीनही कृषी कायदे रद्द करण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. प्रकाश पर्वाच्या पृष्ठभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायदे रद्द करण्याबाबत केलेली घोषणा, शेतकर्यांची मागितलेली माफी यापेक्षा काहीही मोठे असू शकत नाही. नरेंद्र मोदी यांनी देशाच्या कल्याणासाठी कृषी कायदे आणले होते, असे अमरिंदरसिंग यांनी सांगितले.
आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्यांचे स्मारक उभारले जाईल, अशी घोषणा यापूर्वी पंजाबमधील कॉंग्रेस सरकारने केली आहे. स्वातंत्र्यलढ्यानंतर झालेले हे एक मोठे आंदोलन आहे. या आंदोलनामुळे देशाची लोकशाही सशक्त झाली. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्यांचे स्मारक उभारले जाईल, असे पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी सांगितले होते.