किमान तापमान : 29.99° से.
कमाल तापमान : 30.02° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 2.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
26.96°से. - 30.45°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशहैद्राबाद, २१ नोव्हेंबर – आंध्रप्रदेशमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या वेगवेगळ्या घटनांत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढून २८ झाली आहे. यात राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या सदस्याचाही समावेश आहे. राज्यात १७ जण बेपत्ता असल्याचे वृत्त आहे.
भारतीय वायुदल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, पोलिस आणि अग्निशमन सेवा कर्मचार्यांनी अनंतपुरमू, कडप्पा आणि चित्तोर जिल्ह्यातील एका पोलिस निरीक्षकासह किमान ६४ जणांची पुरातून सुटका केली.
कडप्पा आणि अनंतपुरमू जिल्ह्यात शुक्रवारपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या हानीचा अंदाज घेण्यासाठी मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी कडप्पा, अनंतपूरमू आणि चित्तोर जिल्ह्यात हवाई पाहणी केली. अतिवृष्टीत मृत्युमुख पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
नेल्लोर जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला असून, पेन्नार नदीला आलेल्या पुरामुळे शनिवारी येथील अनेक गावांचा संपर्क तुटला. पूरग्रस्त भागातील हजारो लोकांना नेल्लोर जिल्ह्यातील शिबिरांमध्ये हलवण्यात आले, अशी माहिती अधिकार्यांनी दिली. या जिल्ह्यात मदतीसाठी राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची पथके पाठविण्यात आली आहेत. एकूण २० हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्याचे वृत्त आहे.
शनिवारी पावसाची तीव्रता कमी झाली. तिरुमला तिरुपती देवस्थानाने वाहतुकीसाठी पुन्हा घाट रस्ते खुले केले. मात्र, डोंगरावर जाण्यासाठी असलेले दोन जिने भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले. आभासी स्वरूपात नोंदणी केलेल्या भाविकांसाठी भगवान व्यंकटेश्वराच्या दर्शनाची परवानगी देण्यात आली.
तामिळनाडूत १५ हजारांपेक्षा जास्त बेघर
तामिळनाडूतील विल्लुपूरम् आणि कुड्डालोर जिल्हे थेनपेन्नईच्या नदीला आलेल्या पुरामुळे प्रभावित झाले आहेत. दोन्ही जिल्ह्यांतील जवळपास १५ हजार लोकांना मदत शिबिरांमध्ये हलवण्यात आले. विल्लुपूरममधील १८,५०० हेक्टर शेतजमीन थेपनई नदीला आलेल्या पुरामुळे पाण्याखाली गेली आहे. कृष्णगिरी आणि तिरुवन्नमलाई जिल्ह्यात मागील चोवीस तासांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन मदतकार्याचा वेग वाढवण्याचा आदेश अधिकार्यांना दिला.