किमान तापमान : 30.79° से.
कमाल तापमान : 30.92° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 0.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.92° से.
27.34°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवीन मंत्रिमंडळात ११ कॅबिनेट मंत्री,
जयपूर, २१ नोव्हेंबर – राजस्थानातील नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आज रविवारी पार पडला. यात १५ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली सोबतच पायलट गटाच्या पाच आमदारांनाही नव्याने मंत्रिमंडळात संधी देण्यात आल्याचे वृत्त आहे. नवीन मंत्रिमंडळात ११ कॅबिनेट मंत्री आहेत.
राजभवनात आयोजित शपथविधी समारंभात १५ मंत्र्यांना त्यांच्या ज्येष्ठतेच्या आधारे शपथ देण्यात आली. राज्यपाल कलराज मिश्र यांनी नव्या मंत्र्यांना शपथ दिली. ममता भूपेश, भजन लाल जाटव आणि टिकाराम ज्युली या राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून बढती देण्यात आली. बंडखोरीमुळे मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आलेले विश्वेन्द्रसिंह आणि रमेश मीणा यांना पुन्हा स्थान मिळाले आहे. हेमाराम चौधरी, महेंद्रजितसिंह मालवीय, रामलाल जाट, महेश जोशी, गोविंदराम मेघवाल आणि शकुंतला रावत यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. याशिवाय झाहिदा, ब्रजेन्द्रसिंह ओला, राजेंद्र गुढा आणि मुरारीलाल मीणा यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या मंत्रिमंडळात पायलट गटाच्या पाच मंत्र्यांना संधी देण्यात आली आहे. एकूण ११ कॅबिनेट आणि चार राज्यमंत्र्यांचा शपथविधीत समावेश होता. यासोबतच राजस्थानातील अशोक गहलोत यांच्या मंत्र्यांची संख्या ३० झाली आहे.
मंत्रिमंडळाची पुनर्रचना आगामी विधानसभा निवडणुकीचा दृष्टिकोन समोर ठेवूनच करण्यात आली आणि त्याच हिशेबाने खातेवाटपही होत असल्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी म्हटले आहे.