किमान तापमान : 29.03° से.
कमाल तापमान : 31° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 5.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31° से.
27.43°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.11°से. - 29.65°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.11°से. - 30.16°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.62°से. - 31.24°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.06°से. - 30.11°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.3°से. - 30.22°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशबंगळुरू, २२ नोव्हेंबर – अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे दक्षिण भारतात पावसाने थैमान घातले आहे. चार दिवसांपासून कर्नाटकात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, हजारो लोक बेघर झाले आहेत. मुसळधार कोसळणार्या पावसामुळे कर्नाटकात आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला असल्याची नोंद झाली आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यात संततधार पाऊस सुरू आहे. रस्त्यांसोबत शेतातही पाणी झाले असून, मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होऊन जवळपास पाच लाख हेक्टर जमिनीवरील पिके पाण्यात गेली आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला असून, १ नोव्हेंबरपासून आतापर्यंत केलेल्या प्राथमिक नुकसान आणि नुकसानीच्या अंदाजानुसार, ६५८ घरांचे पूर्णपणे, तर ८,४९५ घरांचे अंशत: नुकसान झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या पावसामुळे जिवितहानी झाली असून, १९१ जनावरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली.
मुख्यमंत्री बोम्मई यांनी राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर आढावा बैठक घेतली. त्यानंतर तत्काळ स्वरूपाच्या मदतीची घोषणा केली. ७९ हजार शेतकर्यांना ७९ कोटी रुपयांची मदत जारी करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व आधिकार्यांना नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. घ(वृत्तसंस्था)
आंध्रप्रदेशात बळीसंख्या ३३
आंध्रप्रदेशातील मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ३३ जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. १२ जण बेपत्ता आहेत. या पावसामुळे राज्याची रेल्वे व्यवस्था प्रभावित झाली आहे. नेल्लोरजवळ पादुगुपाडू येथे रेल्वे रूळाचे नुकसान झाल्याने १०० पेक्षा जास्त एक्सप्रेस रेल्वे रद्द करण्यात आल्याची माहिती दक्षिण-मध्य रेल्वेने दिली. २९ रेल्वेमार्ग बदलण्यात आले आहेत. काही महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतूक सुरक्षेच्या पृष्ठभूमीवर बंद करण्यात आली आहे.