किमान तापमान : 28.99° से.
कमाल तापमान : 29.63° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 2.05 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.24°से. - 29.61°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.47°से. - 31.24°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.29°से. - 31.41°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.45°से. - 30.88°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.91°से. - 30.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.48°से. - 30.03°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाशनाव लवकरच कळणार,
चंदीगड, २७ ऑक्टोबर – पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी आज बुधवारी येथे नवीन पक्षाची घोषणा केली. निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर पक्षाच्या नावाची आणि चिन्हाची माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
लवकरच स्वतःचा नवीन पक्ष स्थापन करणार आहे. तीन कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर तोडगा निघाल्यावर भाजपासोबत जागावाटप होण्याची अपेक्षा आहे, असे त्यांनी मागील आठवड्यात सांगितले होते.
मी नवीन पक्ष स्थापन करीत आहे. मात्र, त्याचे नाव आताच सांगता येणार नाही. निवडणूक आयोगाने पक्षाच्या नावाला आणि चिन्हाला मान्यता दिल्यानंतर मी तुम्हाला याबाबत सांगू शकेल. सध्या निवडणूक आयोगाच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे, असे अमरिंदरसिंग यांनी आज येथे आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. मी पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाला विनंती केली आहे, असे त्यांनी सांगितले. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे.
दरम्यान, अमरिंदरसिंग यांच्यासोबत राजकीय वैमनस्य असलेले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुन्हा अमरिंदरसिंग यांच्यावर टीका केली आहे. कॉंग्रेसचे ७८ आमदार आहेत. कॅप्टन अमरिंदरसिंग यांची निष्ठा ईडीवर नियंत्रण असलेल्या भाजपासोबत आहे. स्वतःची कातडी वाचवण्यासाठी त्यांनी पंजाबचे हित विकले आहे. तुमच्यासारख्या नकारात्मक ऊर्जा पंजाबमधील विकास व न्यायाला रोखत आहेत, अशी टीका सिद्धू यांनी ट्विटरवर केली.
अकाली दलातून बाहेर पडलेल्या समविचारी घटकांसोबत आघाडी करण्याचा विचार करीत असल्याचा पुनरुच्चार अमरिंदरसिंग यांनी केला. माझ्या राज्याचे आणि माझ्या लोकांचे भविष्य सुरक्षित करेपर्यंत मी शांत बसणार नाही, असे त्यांनी यापूर्वी सांगितले होते.
शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर आज अमित शाहांना भेटणार
केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची उद्या गुरुवारी भेट घेऊन तीन नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर चर्चा करणार असल्याची माहिती अमरिंदरसिंग यांनी दिली. काही कृषी तज्ज्ञांसोबत अमित शाह भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मी उद्या अमित शाह यांची भेट घेणार असून, माझ्यासोबत या वेळी २५ ते ३० जण असतील. मी पंजाबचा मुख्यमंत्री होतो तसेच शेतकरीदेखील असल्याने या मुद्यावर तोडगा काढण्यास माझी मदत मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले. शेतकर्यांच्या मुद्यावर यापूर्वी तीन वेळा अमित शाह यांची भेट घेतली आहे. शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर कोणतेही सूत्र ठरलेले नसले, तरी आंदोलक आणि सरकारमध्ये होणार्या चर्चेतून यावर तोडगा निघू शकतो. या मुद्यावर तोडगा निघावा, अशी शेतकर्यांची इच्छा आहे, असे त्यांनी सांगितले.