किमान तापमान : 29.34° से.
कमाल तापमान : 31.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 43 %
वायू वेग : 5.29 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.99° से.
27.62°से. - 31.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.21°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.54°से. - 31.18°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.65°से. - 30.02°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 29.99°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.32°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलबंगळुरू, २९ ऑक्टोबर –
कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांचे आज शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ४६ वर्षांचे होते. कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वांत प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे कन्नड सिनेसृष्टीवर आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
पुनीत यांना शुक्रवारी दुपारी एक ते दीडच्या दरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यानंतर त्यांना तातडीने बंगळुरूतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.
पुनीत राजकुमार हा कन्नड सुपरस्टार डॉ. राजकुमार यांचा सर्वांत लहान मुलगा आणि प्रसिद्ध स्टार शिवराज कुमार यांचा धाकटा भाऊ आहे. त्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९८५मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेट्टाडा हुवू’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. पुनीत हे २००२मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अप्पू’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आले. त्यांनी आतापर्यंत अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले.