किमान तापमान : 26.99° से.
कमाल तापमान : 27.98° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.39 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.99°से. - 29.5°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 30.84°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.76°से. - 30.97°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.93°से. - 30.63°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.46°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल26.12°से. - 29.61°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाशपंजाबच्या दोन शैक्षणिक संस्थांमधील घटना, पाकिस्तानी विजयाच्या जल्लोषावर लोक नाराज का? : मेहबुबा मुफ्ती,
चंदीगड, २५ ऑक्टोबर – टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्ध झालेल्या सामन्यात रविवारी पाकिस्तानने विजय मिळवल्यानंतर जल्लोष करीत काश्मीरच्या ‘आझादी’चे नारे देणार्या काश्मिरी विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांनी बदडले आहे. पंजाबच्या संगरूर आणि खरार मोहाली येथील संस्थांमध्ये ही घटना घडली आहे.
संगरूर येथील भाई गुरुदास इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग ऍण्ड टेक्नॉलॉजी येथील मारहाणीची चित्रफीत समाजमाध्यमावर सामायिक करण्यात आली. क्रिकेट सामना झाल्यानंतर वसतिगृहात त्यांना मारहाण करण्यात आली. खरार येथील रयत भारत विद्यापीठातही असाच प्रकार घडला.
संगरूर आणि खरार मोहाली येथील काश्मिरी विद्यार्थ्यांना बिहार, उत्तरप्रदेश आणि हरयाणातील विद्यार्थ्यांनी मारहाण केली. त्यांना स्थानिकांनी सोडवले. वसतिगृहातील खोल्यांमध्ये शिरून त्यांना मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळाली, असे जम्मू-काश्मीर विद्यार्थी संघटनेचा राष्ट्रीय प्रवक्ता नासिर खुहेमीने सांगितले. पंजाब पोलिसांनी हस्तक्षेप करून ही मारहाण थांबवली. संगरूर येथील महाविद्यालयात ९० काश्मिरी, तर ३० उत्तरप्रदेश आणि बिहारमधील आहेत.
काश्मिरी विद्यार्थी वसतिगृहाच्या ‘बी’ विंगमध्ये राहतात. पाकिस्तानी खेळाडू फटकेबाजी करीत असताना त्यांनी जल्लोष केला, तसेच आझादीचे नारे लावले होते, अशी माहिती सिंगरूरच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकार्याने दिली.
कॉंग्रेसच्या महिला नेत्याचे आक्षेपार्ह ट्विट
पाकिस्तानच्या विजयानंतर कॉंग्रेसच्या महिला नेत्या आणि राष्ट्रीय माध्यम समन्वयक राधिका खेडा यांनी आक्षेपार्ह ट्विट केले. या आक्षेपार्ह ट्विटनंतर समाजमाध्यमांवर त्यांना ट्रोल करण्यात आले. या ट्विटमध्ये त्यांनी भारताचा पराभव भाजपासोबत जोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भाजपावर टीका करण्याच्या नादात त्याच ट्रोल झाल्या. कॉंगे्रसला यासाठीच देशविरोधी पक्ष म्हणून लोक टीका करतात, असे नेटकर्यांनी सुनावले.
पाकिस्तानी विजयाच्या जल्लोषावर लोक नाराज का?
श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांचे पाकिस्तान प्रेम पुन्हा उफाळले असून, पाकिस्तानी विजयाच्या देशात झालेल्या जल्लोषावर लोक नाराज का, असा उफराटा प्रश्न त्यांनी विचारला. कलम ३७० निष्प्रभ करण्याची आणि पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या विजयाची तुलनाही केली. कलम ३७० निष्प्रभ केल्यानंतर देशभरातील लोकांनी आनंद व्यक्त करीत मिठाई वाटली होती, याचा विसर काश्मिरींना पडलेला नाही, अशी गरळ त्यांनी ओकली.
फटाके फोडणारे भारतीय असूच शकत नाही ः गौतम गंभीर
पाकिस्तानच्या विजयानंतर देशात फटाके फोडून जल्लोष करणार्यांच्या विरोधात माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीर यांनी संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तानी विजयाचा आनंद फटाके फोडून साजरा करणारे भारतीय असूच शकत नाही. ही अत्यंत लाजीरवाणी बाब असून, मी भारतीय संघासोबत आहे, असे ट्विट गौतम गंभीर यांनी केले.
शामीच्या समर्थनासाठी समोर आले क्रिकेटपटू
समाजमाध्यमांवर भारताच्या पराभवाचे खापर वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीवर फोडण्यात आले. शामीचा धर्म आणि त्याच्या कामगिरीचा संबंध कुठेही येत नाही. देशासाठी खेळताना त्याने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे, असे खडे बोल क्रिकेटपटूंनी समाजमाध्यमांवर टीका करणार्यांना सुनावले. माजी फिरकीपटू हरभजनसिंग, माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि फिरकीपटू यजुवेंद्र चहल त्याच्या समर्थनार्थ समोर आले.