किमान तापमान : 27.31° से.
कमाल तापमान : 27.95° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 3.77 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.31° से.
26.99°से. - 30.4°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.67°से. - 31.27°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.13°से. - 31.45°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.51°से. - 30.35°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.72°से. - 30.45°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.49°से. - 29.96°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाशअमित शाह यांची ठोस भूमिका,
श्रीनगर, २५ ऑक्टोबर – कलम ३७० निष्प्रभ करण्यात आल्यापासून आम्हाला टोमणे मारले गेले, अनेकांनी शाप दिला. भारत सरकारने पाकिस्तानशी चर्चा करावी, असा सल्ला देण्यात आला. चर्चा करायचीच असेल, तर आम्ही आमच्या काश्मिरी जनतेशी करू, पाकिस्तानशी नाही, अशी ठाम भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सोमवारी घेतली.
जम्मू-काश्मीर दौर्याच्या तिसर्या आणि शेवटच्या दिवशी अमित शाह यांनी सोमवारी श्रीनगरमध्ये जाहीर सभेला संबोधित केले. जम्मू-काश्मीरमध्ये विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. काश्मीरचा आणि लडाखचा विकास व्हावा, याच उद्देशाने अनेक पावले उचलण्यात आली आहेत. काश्मीरला जे हवे आहे, ते २०२४ पूर्वी सर्वांच्या डोळ्यांसमोर असेल. काश्मीरची शांतता आणि विकासाच्या मार्गात आता कुणीही अडथळा आणू शकत नाही. तुम्ही मोदी सरकारवर विश्वास ठेवा, असे अमित शाह म्हणाले.
देशावर जितका अधिकार माझा आहे, तितकाच काश्मिरी जनतेचा आहे. काश्मीर पंतप्रधान मोदींच्या हृदयात आहे. आम्हाला खोर्यातील तरुणांशी मैत्री हवी आहे. काश्मीरच्या विकासात अडथळे आणणार्यांचा हेतू वाईट आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सर्वप्रथम १०० टक्के लसीकरण करण्यात आले. आता तुमच्यापैकी कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
दगड हातात घेऊ नका
मागील ७० वर्षांपासून तुम्हाला अधिकारांपासून वंचित ठेवले गेले, काश्मिरी तरुणांनी हातात दगड उचलू नये, अशी आमची इच्छा आहे. काश्मीरला स्वतःचा मुख्यमंत्री असावा, जो लंडनला जाणार नाही. येथील तरुणांना ७० वर्षांपासून जिल्हा पंचायत निवडणूक लढवण्याचा अधिकार का दिला नाही, असा सवाल अमित शहा यांनी यापूर्वीच्या सरकारांना केला.
इंटरनेट बंद केले नसते तर…
५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० निष्प्रभ करण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मिरात संचारबंदी जारी करण्यात आली नसती, इंटरनेट सेवा बंद केली नसती, तर त्याची मोठी किंमत तरुणांनाच भोगावी लागली असती. त्यांची दिशाभूल करण्यात आली असती, त्यांना अतिरेकी होण्यास भाग पाडण्यात आले असते, असे ते म्हणाले.
क्षणातच काढले बुलेटप्रूफ कवच
अमित शाह यांनी सभेला संबोधित करण्यापूर्वी त्यांना पुरविण्यात आलेल्या बुलेटप्रूफ काचा दूर केल्या. मला तुमच्याशी सुरक्षा कवचात राहून बोलायचे, मी माझी सुरक्षा हटवली, तुम्ही सुद्धा आपल्या मनातील भीती दूर करा, असे आवाहन शाह यांनी केले.