किमान तापमान : 28.05° से.
कमाल तापमान : 28.18° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 3.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.05° से.
27.95°से. - 30.14°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.06°से. - 30.88°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.63°से. - 31.01°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 29.92°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.35°से. - 30.07°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.17°से. - 29.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशजम्मू, २४ ऑक्टोबर – कलम ३७० निष्प्रभ केल्यानंतर प्रथमच जम्मू-काश्मीरच्या दौर्यावर असलेले केंद्रीय अमित शाह यांनी जम्मू-काश्मीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हृदयात असल्याचे आज रविवारी सांगितले. जम्मूतील अन्यायाचे युग संपले असल्याचे त्यांनी भगवतीनगर परिसरात नागरिकांशी संवाद साधताना सांगितले. अमित शाह यांच्या सभेसाठी जम्मूतील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. नागरिकांनी टाळ्यांच्या कडकटात त्यांचे स्वागत केले.
जम्मूतील नागरिकांकडे दुर्लक्ष करण्याचे दिवस आता संपले आहेत. जम्मू आणि काश्मीरचा आता बरोबरीने विकास होईल, असे शाह यांनी नागरिकांना आश्वस्त केले.
जम्मूतील नागरिकांच्या अन्यायाचे युग संपले आहे. आता कुणीही तुमच्यासोबत अन्याय करणार नाही. या विकासाच्या युगात अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न काही जणांकडून केले जात आहेत, पण हा विकास कुणीही रोखू शकणार नाही, असे मी तुम्हाला आश्वस्त करतो.
श्यामाप्रसाद मुखर्जींच्या बलिदानाची भूमी
जम्मू-काश्मीरचा विकास आता कुणीही रोखू शकणार नाही. ही मंदिरांची भूमी आहे. येथे वैष्णोदेवीचे मंदिर आहे. ही श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानाची भूमी आहे. जम्मू-काश्मीरमधील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणार्या लोकांना आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे अमित शाह यांनी सांगितले.
जम्मू आयआयटीच्या नवीन परिसराचे लोकार्पण
अमित शाह यांच्या हस्ते आज जम्मू आयआयटीच्या नवीन परिसराचे लोकार्पण करण्यात आले. देशातील आधुनिक आयआयटी परिसरांपैकी जम्मूतील एक आहे. हा परिसर पाहून मी प्रभावित झालो आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.
…तर अतिरेक्यांचे मनसुबे उधळले जातील
यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये केवळ सात वैद्यकीय महाविद्यालये होती. आमच्या सरकारने सात नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केली आहेत. येथील तरुण विकासात सहभागी झाले, तर अतिरेक्यांचे मनसुबे उधळले जातील. जम्मू-काश्मिरातील एकाही नागरिकाची हत्या होऊ नये, यासाठी दहशतवादाला हद्दपार करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे, असे त्यांनी सांगितले.
२०२२ पर्यंत ५१ हजार कोटींची गुंतवणूक
या केंद्रशासित प्रदेशात अगोदरच १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. २०२२ च्या अखेरपर्यंत ५१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने निर्धारित केले आहे, असे त्यांनी सांगितले.