किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलपणजी, २३ ऑक्टोबर – आत्मनिर्भर गोव्यासाठी ‘दुहेरी इंजिन’ कायम ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी केले. ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ या योजनेच्या एका कार्यक्रमात त्यांनी योजनेतील भागधारक आणि लाभार्थ्यांसोबत आभासी पद्धतीने संवाद साधला.
केंद्र आणि गोव्यातील सरकारला त्यांनी डबल इंजिन संबोधले. भाजपाची सत्ता असलेल्या गोव्यातील विधानसभा निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारीत होत आहे. विकासाच्या मार्गांचा आणि शक्यतांचा शंभर टक्के वापर केल्यास गोवा आत्मनिर्भर होऊ शकते. सामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच स्वयंपूर्ण गोवा ही योजना आहे, असे मोदी यांनी सांगितले.
स्वयंपूर्ण गोवा हे आपल्या माता-भगिनींच्या कल्याणाचे आणि आरोग्याचे आश्वासन आहे. स्वयंपूर्ण गोव्याच्या माध्यमातून राज्यातील युवक आणि बेरोजगारांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. ही केवळ पाच महिने अथवा पाच वर्षांसाठी आणलेली योजना नव्हे, तर हे पुढील २५ वर्षांच्या व्हिजनचा पहिला टप्पा आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गोव्यातील प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.
त्यामुळे गोव्याच्या सातत्यपूर्ण विकासासाठी दुहेरी इंजिनचे सरकार आवश्यक आहे. सध्या असलेल्या स्थिर सरकार आणि स्पष्ट धोरणांची गोव्याला गरज आहे. तटवर्ती राज्यांना सध्या असलेल्या ऊर्जात्मक नेतृत्वाची गरज आहे. संपूर्ण गोव्याच्या आशीर्वादाने आपण हे राज्य स्वयंपूर्ण करू शकतो, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.