किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलआग्रा, २० ऑक्टोबर – उत्तरप्रदेशच्या आग्रा येथील जगदीशपुरा भागात पोलिस कोठडीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेवरून येथील राजकारण तापायला सुरुवात झाल्याचे दिसत आहे. या व्यक्तीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आग्राकडे निघालेल्या कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका वढेरा यांना उत्तरप्रदेश पोलिसांनी यमुना एक्स्प्रेस-वे वर रोखले व ताब्यात घेतले. त्यामुळे यमुना एक्स्प्रेस-वे च्या प्रवेशाच्या ठिकाणी पोलिस व कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. प्रियांका वढेरांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे कॉंग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. पोलिस व कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादी सुरू झाल्याने वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली. या पृष्ठभूमीवर त्या ठिकाणी पोलिसांकडून कलम १४४ लागू करण्यात आले आहे. दरम्यान, प्रियांका यांनी या घटनेच्या निषेधार्थ एक ट्विट केले आहे. एखाद्याला पोलिस कोठडीत मारहाण करून ठार करणे हा कुठला न्याय आहे, आग्रा पोलिस कोठडीत अरुण वाल्मीकिच्या मृत्यूची घटना निंदनीय आहे, असे प्रियांका वढेरा यांनी म्हटले आहे.
Short URL : https://vrittabharati.in/?p=45570