किमान तापमान : 28.5° से.
कमाल तापमान : 28.83° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 2.86 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.83° से.
27.34°से. - 30.71°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.15°से. - 29.76°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.65°से. - 30.93°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल27.1°से. - 31.17°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.59°से. - 30.7°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.71°से. - 30.37°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशप्रचंड दहशत, पुन्हा न परतण्याची घेतली शपथ,
जम्मू, १८ ऑक्टोबर – जम्मू-काश्मीरमध्ये लक्ष्यीत हत्येच्या घटना वाढल्या आहेत. काश्मीरच्या कुलगाममध्ये सलग दुसर्या दिवशी दहशतवाद्यांनी गैर-काश्मिरी मजुरांची गोळ्या झाडून हत्या केली. यात दोन मजूर ठार झाले तर एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. जीव वाचवण्यासाठी गैर-काश्मिर मजूर स्थलांतर करीत आहेत. आपल्या राज्यात परतणार्या मजुरांची जम्मू रेल्वे स्थानकावर गर्दी झाली आहे. अनेकांनी तर काश्मिरात पुन्हा कधीच न येण्याची शपथ घेतली आहे.
या महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी ११ गैर-काश्मिरी लोकांची हत्या केली. ओळखपत्र पाहून दहशतवादी लोकांना मारत आहेत. जम्मू-काश्मीरच्या काकापुरा येथे विटांच्या भट्टीत काम करणार्या २५ ते २६ मजुरांनी पुन्हा आपल्या राज्यात छत्तीसगडमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आमचे उरलेले पैसै परत मिळावे, अशी विनंती या मजुरांनी सरकारकडे केली आहे. तसेच काश्मीर खोर्यात कठोर कायदा व सुव्यस्था लागू करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आपल्या राज्यात परतल्यानंतर पुन्हा काश्मीरमध्ये कधीच येणार नसल्याचे या मजुरांचे म्हणणे आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी गैर-काश्मिरी मजुरांना शिबिरात स्थलांतरीत करण्याची मागणीही या मजुरांनी केली आहे.