किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलअनेक शहरे पाण्यात, बचाव मोहिमेसाठी वायुसेना सज्ज,
तिरुवनंतपुरम्, १७ ऑक्टोबर – केरळमध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून, भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. २० पेक्षा अधिक जण बेपत्ता आहेत, तर कोक्कायारमध्ये आज रविवारी तीन मृतदेह आढळून आले. मुवत्तुपुझा नदीची पातळी वाढत असून, पुरात अडकलेल्यांच्या सुटकेसाठी लष्कराला तैनात करण्यात आल्याची माहिती जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.
केरळमध्ये मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि पुरामुळे कोट्टायम् येथील २१ आणि इडुक्कीमधील पाच अशा एकूण २६ जणांचा मृत्यू झाला. २० जण गंभीर जखमी असून, कोट्टायम् येथे भूस्सखलनामुळे २० पेक्षा अधिक जण बेपत्ता आहेत. लष्करी जवानाकडून शोधमोहीम राबवण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने पातनमथिट्टा, कोट्टायम्, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर जिल्ह्यांत अतिदक्षतेचा तर तिरुवनंतपुरम्, कोल्लम, अलापुझा, पलक्कड, मलप्पुरम, कोझिकोड आणि वायनाड जिल्ह्यांत दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील बचाव मोहिमेबद्दल मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले की, पीडितांची मुसळधार पाऊस आणि पुरातून सुटका करण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे. संपूर्ण राज्यात १०५ आश्रय शिबिरे तयार करण्यात आले आहेत. पातनमिथिट्टा, कोट्टायम्, एर्नाकुलम आदी ठिकाणी एनडीआरफचे ११ पथक तैनात केली असून, गरज पडल्यास भारतीय वायुसेनेची मदत घेतली जाईल.
दरम्यान, त्रावणकोर देवस्वोम बोर्डाने भगवान अयप्पाच्या भक्तांनी रविवार आणि सोमवारी पठानमथिट्टा जिल्ह्यातील शबरीमाला मंदिरात न जाण्याची सूचना केली आहे.
केरळला सर्वपरीने मदत करू : अमित शाह
केरळमधील पूरस्थितीवर कें द्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले की, केंद्र सरकार या राज्यातील पाऊस आणि पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहे. शोधमोहिम आणि बचावासाठी राज्य सरकारला हवी असलेली मदत उपलब्ध देण्यात येईल. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यापूर्वीच रवाना करण्यात आले आहेत. आपण पीडितांच्या सुरक्षासाठी प्रार्थना करीत आहोत. केरळमधील पूरस्थितीबाबत अमित शाह यांनी टि्वटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
डेहराडून ः उत्तराखंडमधील राजधानी डेहराडूनसह राज्यातील अनेक भागातील हवामान बदलले असून, पुढील दोन ते तीन दिवसांत चारधामसह बहुतांश डोंगराळ भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलिस प्रशासन आणि सर्व जिल्हाधिकारी यांना सज्ज राहण्याचा आदेश दिला आहे. राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. यावेळी ८० किमी प्रती तास वेगाने हवा वाहण्याची शक्यता असून, पिथौरागड, बागेश्वर, चमोली, रुद्रप्रयाग आणि उत्तरकाशी भागात ३५०० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या भागात बर्फवृष्टी होऊ शकते. सध्या डेहराडून शहरात पाऊस सुरू असून, मसूरीमध्ये पावसामुळे थंडी जाणवू लागली आहे. आज रविवारी मसूरी-डेहराडून मार्गावर भूस्सखलन झाल्यामुळे काही काळ वाहतूक थांबली होती.