किमान तापमान : 29.03° से.
कमाल तापमान : 31° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 5.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31° से.
27.43°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.11°से. - 29.65°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.11°से. - 30.16°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.62°से. - 31.24°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.06°से. - 30.11°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.3°से. - 30.22°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशपश्चिम बंगालचाही झाला जळफळाट,
चंदीगड, १४ ऑक्टोबर – केंद्रीय गृह मंत्रालयाने पंजाबसह देशभरातील सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) अधिकारक्षेत्रात वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावरून पंजाब कॉंग्रेसमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. पश्चिम बंगाल सरकारनेही या निर्णयावर आक्षेप घेत, आमच्या अधिकारांमध्ये केंद्राचा हा अनावश्यक हस्तक्षेप असल्याचे या सरकारने म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयाचे कॉंग्रेसचे नेते व पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी स्वागत केले, तर विद्यमान मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे.
बीएसएफ अधिकार्यांना पश्चिम बंगाल, पंजाब व आसाममध्ये देशाच्या सीमेपासून ५० कि. मी.पर्यंतच्या भागात तपास, अटक आणि जप्तीची परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. यापूर्वी बीएसएफला केवळ १५ किलोमीटरपर्यंत कारवाईचे अधिकार होते. गुजरातसह काही राज्यांत सीमा सुरक्षा दलाचे अधिकारक्षेत्र कमी केले. सोबतच, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, नागालॅण्ड या राज्यांत बीएसएफचे अधिकारक्षेत्र कमी करण्यात आले. या राज्यांतील बीएसएफचे अधिकार क्षेत्र पूर्वी ८० किलोमीटरपर्यंत होते, ते आता २० किलोमीटरपर्यंत कमी करण्यात आले आहे.
पाकिस्तान सीमेवर बीएसएफचे कार्यक्षेत्र ५० किमीपर्यंत वाढवण्यात आल्यानंतर संबंधित राज्यांकडून केंद्र सरकारवर अधिकारहननाचा आरोप केला जात आहे. मुख्यमंत्री चन्नी यांनी केंद्राच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी यांनी या निर्णयाचे स्वागत केले. भाजपेतर पक्षांनीही केंद्राच्या हेतूवर शंका उपस्थित केली आहे.
संघराज्य रचनेवर हल्लाच : चन्नी
सरकारचा हा निर्णय म्हणजे संघराज्य संरचनेवर थेट हल्ला आहे. बीएसएफला ५० किलोमीटरपर्यंत कारवाईचा अधिकार देण्याचा निर्णय तर्कहीन आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हा निर्णय मागे घ्यावा, असे मुख्यमंत्री चन्नी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा यांनीही या निर्णयाचा तीव्र विरोध केला आहे. हा राज्यांच्या अधिकारांवर थेट हल्ला आहे. मी पतंप्रधान व गृहमंत्र्यांना हा निर्णय मागे घेण्याचा आग्रह करीत आहे, असे रंधावा यांनी म्हटले आहे.
सीमा सुरक्षा दलाचे स्पष्टीकरण
सीमारेषांचा निर्णय बीएसएफच्या कार्यक्षेत्रात एकसारखेपणा आणण्यासाठी घेण्यात आला आहे. या सुधारणांमुळे पंजाब, पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान आणि आसाम या राज्यांमध्ये बीएसएफला सीमेवरील गुन्हे कमी करण्यासाठी मदत होईल. या राज्यांमध्ये आता बीएसएफला ५० किलोमीटरच्या परिसरात काम करता येईल, असे स्पष्टीकरण सीमा सुरक्षा दलाने दिले आहे.
कॅप्टन अमरिंदर यांच्याकडून स्वागत
पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले. सुरक्षादलाला नाहक राजकारणात ओढले जाऊ नये. आपले जवान काश्मीरमध्ये हुतात्मा होत आहेत. पंजाबमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी शस्त्रस्त्र व मादक पदार्थ पाठवत आहेत. अशावेळी बीएसएफचे सामर्थ्य वाढविणे आवश्यक होते, असे त्यांनी म्हटले आहे. भारताच्या सुरक्षेसंबंधी आपल्याला राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा. केंद्रीय सशस्त्र दलांना राजकारणात ओढू नका, असेही ते म्हणाले.