किमान तापमान : 30.33° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 4.01 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.43°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनेत्यांच्या कुजबुजीच्या व्हायरल व्हिडीओने खळबळ,
बंगळुरू, १४ ऑक्टोबर – पंजाब आणि छत्तीसगडमधील अंतर्गत गटबाजीने कॉंग्रेस हायकमांडची चांगलीच दमछाक झाली. आता कर्नाटक कॉंग्रेसमधील सुंदोपसुंदी एका व्हायरल व्हिडीओमुळे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. कर्नाटक कॉंग्रेसचे माध्यम समन्वयक एम. ए. सलीम आणि वरिष्ठ नेते व्ही. एस. उग्रप्पा यांच्यातील चर्चेचा एक कथित व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. यामुळे राज्यातील सत्ताधारी भाजपाला टीका करण्याची आयती संधी मिळाली. हा व्हिडीओ कर्नाटक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्याशी संबंधित आहे. यात कॉंग्रेसचे दोन्ही नेते सलीम आणि उग्रप्पा आपसात कुजबुजत आहेत आणि डी. के. शिवकुमार यांच्यावर आरोप करीत आहेत.
शिवकुमार हे १० टक्के लाच घेतात आणि त्यांच्या साथीदारांनी शेकडो कोटींची संपत्ती निर्माण केली आहे.
शिवकुमार पूर्वी सहा ते आठ टक्के कमिशन घेत होते. आता त्यांनी कमिशन वाढवले असून, १० ते १२ टक्के केले आहे. हा एक मोठा घोटाळा आहे. यात जितके जास्त खोलात जाल, तुम्हाला अधिक प्रकरणे दिसून येतील.
शिवकुमार यांच्या जवळचे असलेल्या मुलगुंडने ५० ते १०० कोटींची कमाई केली आहे आणि मुलगुंडकडे इतकी मालमत्ता असेल तर मग शिवकुमारकडे किती असेल, असा आरोप माध्यम समन्वयक सलीम यांनी केला आहे.
शिवकुमार हे तोतरे बोलतात. हे कमी रक्तदाबामुळे होते की दारुमुळे हे माहिती नाही. आम्ही अनेक वेळा चर्चाही केली आहे. मीडियानेही विचारले आहे, असे व्हिडीओत ऐकायला येत आहे. या संपूर्ण व्हायरल व्हिडीओमध्ये सलीम आणि उग्रप्पा हे शिवकुमार यांच्यावर दारू पिऊन, कमिशन घेतल्याचा आरोप करताना ऐकायला येत आहे.
भाजपने हा व्हिडीओ व्हायरल केला आहे. शिवकुमार हे लुटारू असल्याचा आरोपही भाजपाने केला आहे. कॉंग्रेसमधील त्यांचेच नेते शिवकुमार यांचे पितळ उघडे पाडत आहेत, अशी टीका भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय केली आहे.