किमान तापमान : 29.99° से.
कमाल तापमान : 30.02° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 2.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.14°से. - 30.61°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशतब्बल साडेचार कोटींच्या नोटांची सजावट,
हैदराबाद, १२ ऑक्टोबर – नवरात्रीच्या निमित्ताने देशभरात देवीच्या मंदिरांना अनेक प्रकारे आकर्षक पद्धतीने सजवले जात आहे. त्यात विविध फुलांचा किंवा इतर गोष्टींचा वापर केला जातो. तेलंगणाच्या मेहबूबनगरमध्ये कन्यका परमेश्वरी देवीची नवरात्री निमित्ताने भक्तांनी अर्पण केलेल्या दानाने सजावट करण्यात आली आहे. वर्षभरात देवीला भक्तांनी अर्पण केलेल्या रुपयांच्या नोटांनी हे मंदिर सजवण्यात आले आहे.
एकूण ४ कोटी ४४ लाख ४४ हजार ४४ रुपयांच्या नोटांनी देवीचे मंदिर सजवण्यात आले आहे. केवळ देवीचा मखरच नाही तर मंदिरातल्या भिंतींवरही नोटांची सजावट करण्यात आली आहे. २०००, ५००, २००, १०० च्या नोटांची फुले बनवून ते देवीला अर्पण करण्यात आले आहे. या सजावटीची आता चांगलीच चर्चा सुरू आहे.
मंदिरात देवीला आणि तिच्या आजूबाजूच्या भिंतींना नोटांनी सजवण्यात आले आहे. दुसरीकडे नेल्लोरमध्येही कन्यका परमेश्वरी देवीला नोटा, सोने आणि चांदीच्या माध्यमातून सजवण्यात आले आहे. यामध्येही पाच कोटी १६ लाख रुपयांच्या नोटांचा वापर करण्यात आला आहे. या नोटांच्या माध्यमातून देवीच्या मंदिरातील फुलांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच गाभार्यातील भिंतीवरही नोटांच्या माध्यमातून अनेक आकर्षक गोष्टी तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मंदिराच्या भव्यतेमध्ये अधिक भर पडल्याचे दिसून येत आहे.