किमान तापमान : 26.96° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 42 %
वायू वेग : 5.95 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
24.55°से. - 29.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.97°से. - 28.27°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.86°से. - 29.14°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.71°से. - 28.32°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.78°से. - 27.76°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.41°से. - 27.59°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलनवी दिल्ली, २७ डिसेंबर – पंजाबमध्ये भाजपा, कॅप्टन अमरिंदरसिंग यांची पंजाब लोक कॉंग्रेस आणि सुखदेवसिंग धिंडसा यांच्या नेतृत्वातील शिरोमणी अकाल दल (संयुक्त) एकत्रितपणे निवडणूक लढणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री आणि पंजाब भाजपाचे प्रभारी गजेंद्र शेखावत यांनी आज केली. हे तिन्ही पक्ष लवकरच आपले संयुक्त घोषणापत्र जारी करतील, असे ते म्हणाले.
पंजाबमधील विधानसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेबाबत अमरिंदरसिंग आणि धिंडसा यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक भाजपा नेते उपस्थित होते.
जागावाटपाबाबतचा निर्णय घेण्यासाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. तीन पक्षांचे संयुक्त घोषणापत्र तयार करून ते लवकरच जाहीर केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
पंजाब विधानसभेसाठी यावेळी पंचरंगी लढत होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या नेतृत्वातील आघाडी, कॉंग्रेस, आम आदमी पार्टी, शिरोमणी अकाली दल (बादल गट) तसेच विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन बनवलेली आघाडी यांच्यात पंचरंगी लढत होणार आहे. ११७ सदस्यीय पंजाब विधानसभेत भाजपा मोठ्या भावाची भूमिका निभावण्याची शक्यता आहे. भाजपा ७०, पंजाब लोक कॉंग्रेस ३० ते ३५ तसेच शिरोमणी अकाली दल (संयुक्त) यांच्या वाट्याला १० ते १५ जागा येण्याची शक्यता आहे.