किमान तापमान : 26.14° से.
कमाल तापमान : 27.37° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 2.98 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.37° से.
23.94°से. - 28.01°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 28.79°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलआ. पुष्पराज जैनवर आयकर विभागाची कारवार्ई,
आणखी दोन अत्तर व्यापारीही रडारवर,
कानपूर, ३१ डिसेंबर –
उत्तरप्रदेशातील अत्तराच्या व्यापार्यांवर कारवाई सुरूच असून, पीयूष जैन यांच्यावरील कारवाईनंतर आता आयकर विभागाने आज शुक्रवारी कानपूर येथील अत्तराचे व्यापारी पुष्पराज जैन यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली. पुष्पराज जैन हे समाजवादी पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी ९ नोव्हेंबर रोजी समाजवादी परफ्युम लॉंच केले होते.
आयकर विभागाचे एक पथक आज सकाळी सात वाजता पुष्पराज जैन यांच्या निवासस्थानी धडकले, अशी माहिती सूत्राने दिली. त्यांचे निवासस्थान आणि कार्यालयासह एकूण ५० ठिकाणांवर आयकर विभागाने छापेमारी केली. इतर राज्यांतील त्यांच्या ठिकाणांवरही आयकर विभागाने छापेमारी केली, असे सूत्राने सांगितले.
पुष्पराज जैन यांच्या व्यतिरिक्त आयकर विभागाने मोहम्मद याकूब नावाच्या अत्तर व्यावसायिकावरही छापेमारी केल्याचे वृत्त आहे. भारतीय औषध महानियंत्रकांच्या पथकाने मलिक परफ्युमचे मालक मलिक मियॉं यांच्या कन्नौज येथील ठिकाणांवर छापेमारी केली आहे. मलिक मियॉं कन्नौजमधील सर्वांत जुन्या आणि मोठ्या व्यापार्यांपैकी एक आहेत. ही छापेमारी मंडई आणि छिप्पट्टी भागात केली जात आहे. कन्नौजसोबतच कानपूर आणि नोएडा भागातही छापेमारी सुरू आहे.
एकाच नावाचा फायदा-तोटा!
पीयूष जैन आणि पुष्पराज जैन यांच्यामध्ये नेहमीच नामसाधर्म्यामुळे गोंधळ उडत असल्याचे स्थानिक सांगतात. दोघांच्या नावांची आद्याक्षरे आणि आडनाव सारखेच असल्यामुळे हे घडत आहे. त्यामुळे काही कायदेशीर बाबींमध्येदेखील पीयूष जैन यांची प्रकरणे पुष्पराज जैन यांच्यापर्यंत पोहोचल्याचेदेखील सांगितले जाते. हे दोघेही अत्तर व्यावसायिकच आहेत.
व्यवसाय वाढला तरच देशाची प्रगती
व्यवसाय वाढला तरच देशाची प्रगती होईल, असे पुष्पराज जैन यांनी गुरुवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. व्यापाराला चालना मिळेल असे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. समाजवादी पक्षाच्या कार्यालयात परफ्युमचे वितरण आम्ही निःशुल्क करतो, त्यामुळे वैरभावना संपुष्टात येते, असे त्यांनी या मुलाखतीत म्हटले होते.
भाजपाचे कटकारस्थान
पीयूष जैन यांच्यावर चुकून छापे मारण्यात आले, असे मी सुरुवातीपासूनच म्हणत होतो. भाजपाला उत्तरप्रदेशातील व्यापार्यांना बदनाम करायचे होते. म्हणून आता त्यांनी कानपूरच्या पुष्कराज जैन यांच्याकडे छापा टाकला आहे. आयकर छापेमारी हे भाजपाचेच कटकारस्थान असल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केला आहे.
अत्तर व्यापार्याच्या घरी प्रचंड संपत्ती सापडल्यानंतर त्याचा संबंध आमच्या पक्षाशी जोडला जात आहे. मुळात भाजपा सूड उगविण्यासाठी या धाडसत्राच्या माध्यमातून दुर्गंध पसरविण्याचे काम करीत आहे. कन्नौजला अत्तराचा इतिहास आहेच. येथील व्यापार्यांनी अत्तराच्या व्यवसायात देश-विदेशात नाव कमावले आहे. आता भाजपा त्यांची प्रतिमा खराब करण्याचे काम करीत आहे. सपाचे विधान परिषदेतील आमदार पुष्कराज जैन यांच्यावरील छापेमारीविषयी बोलताना अखिलेश म्हणाले की, भाजपाला आपला पराभव स्पष्ट दिसत असावा. त्यामुळे त्यांनी अस्वस्थ होऊन अशा कारवायांना सुरुवात केली आहे. आता जनताच यांना धडा शिकवेल.
अखिलेश छापेमारीला का घाबरतात?
उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पार्टीच्या निकटवर्तीय व्यापार्यांवर आयकराच्या धाडी गाजत आहेत. याचा संबंध भाजपाशी जोडला जात आहे. प्रत्यक्षात त्या पैशाशी भाजपाचा काहीही संबंध नाही. सपाचाही याच्याशी संबंध नसेल तर, अखिलेश यादव या छापेमारीला का घाबरत आहेत, असा सवाल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी केला आहे.
आयकर विभागाची कारवाई ही गुप्तहेर संस्थेच्या माहितीच्या आधारे करण्यात आली. कोणत्याही सामान्य व्यक्तीकडे मोठी संपत्ती सापडू शकत नाही. या कारवाईतून काही असंबद्ध साहित्यही समोर येत आहे. जीएसटीच्या माहितीच्या आधारे हे धाडसत्र राबविण्यात आले आहे. पण, अखिलेश यादव यांच्या वक्तव्यांवरून ते या छाप्यांमुळे व्यथित झाल्याचे दिसून येत आहेत, असा चिमटा सीतारामन यांनी काढला.