किमान तापमान : 25.99° से.
कमाल तापमान : 26.14° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 2.98 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.99° से.
23.94°से. - 28.01°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 28.79°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलपुलवामा हल्ल्याचा होता सूत्रधार,
श्रीनगर, १ जानेवारी – अनंतनागमधील चकमकीत सुरक्षा दलाने ठार केलेल्या तीन अतिरेक्यांपैकी एका अतिरेक्याचे छायाचित्र २०१९ मध्ये पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या भीषण हल्ल्याचा सूत्रधार समीर दारसोबत जुळले आहे. त्यामुळे या अतिरेक्याच्या मृतदेहाची डीएनए चाचणी केली जाणार असल्याची माहिती काश्मीरचे महानिरीक्षक विजयकुमार यांनी आज शनिवारी दिली.
अनंतनाग येथे ३० डिसेंबर रोजी ठार करण्यात आलेल्या तीनपैकी एका अतिरेक्याचे छायाचित्र समीर दारसोबत जुळत आहे. समीर पुलवामा आणि लेथपुरा हल्ल्यातील शेवटचा जिवंत अतिरेकी आहे. त्यामुळे ठार झालेल्या अतिरेक्याची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे ट्विट विजयकुमार यांनी केले.
अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलासोबत गुरुवारी झालेल्या चकमकीत जैशच्या तीन अतिरेक्यांना ठार करण्यात आले. घटनास्थळावरून त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. त्यांची ओळख पटली असून, सुल्तान उर्फ रईस उर्फ माविया (विदेशी अतिरेकी), दुदवांगन कापरानमधील निसार अहमद खांडाय आणि नाथिपुरा दुरू येथील अल्ताफ अहमद शहा अशी या अतिरेक्यांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. श्रीनगरमधील झेवन येथे पोलिसांच्या बसवर झालेल्या हल्ल्यात शाह आणि सुल्तानचा सहभाग होता, असे विजयकुमार यांनी सांगितले.