किमान तापमान : 24.99° से.
कमाल तापमान : 26.04° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 2.28 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
24.85°से. - 28.15°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.65°से. - 28.75°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.74°से. - 28.47°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.32°से. - 29.01°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.06°से. - 28.38°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश23.5°से. - 28.34°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलरद्द होऊ शकतो विवाह, दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल,
नवी दिल्ली, २ जानेवारी – भारतात विवाहसंस्थेचे महत्त्व अधिक आहे. लग्नानंतर आयुष्यभर एकमेकांच्या सुख- दु:खात सोबत राहण्याच्या शपथा घेतल्या जातात. त्यात विश्वासघात किंवा धोका दिला तर नात्याला ग्रहण लागतेच. अशातच आता दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निकाल दिला आहे. लग्नाआधी पती किंवा पत्नीने त्यांना असलेल्या आजारांबद्दल माहिती न देणे फसवणूक असून, अशा स्थितीत लग्न रद्द होऊ शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा एक आदेश रद्द करीत एका व्यक्तीचे लग्न रद्द करण्याचा आदेश न्या. विपीन सांघी आणि न्या. जसमीतसिंह यांच्या खंडपीठाने दिला.
या प्रकरणातील महिलेने मान्य केले आहे की, तिला महाविद्यालयीन वयापासून डोकेदुखीचा त्रास होता, त्यामुळे तिचे शिक्षण बंद झाले. डोकेदुखी मोठा आजार नाही. हे केवळ एखाद्या आजाराचे लक्षण आहे. मात्र, महिलेने हे सांगितले नव्हते की, तिला गंभीर आणि सततची डोकेदुखी होती. मानसिक आजाराने पीडित असलेल्या व्यक्तीच्या मुलांवरदेखील याचा परिणाम होऊ शकतो. लग्नाच्या जवळपास नऊ आठवड्यानंतर या महिलेच्या वडिलांनी तिला आपल्या घरी नेले होते.
या सर्व प्रकरणात दुर्देवी पद्धतीने पतीचे आयुष्य त्रासदायक झाले. तो नाहक गेल्या १६ वर्षांपासून या नात्यात अडकून पडला. जीवनाच्या सर्वांत महत्त्वाच्या काळात याचिकाकर्त्याला वैवाहिक आनंद मिळू शकला नाही. महिलेच्या हट्टापायी त्याला त्रास सोसावा लागला, असे नमूद करीत न्यायालयाने महिलेला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला.
काय आहे प्रकरण
या प्रकरणात पतीने एक याचिका दाखल करीत म्हटले होते की, १० डिसेंबर २००५ रोजी त्याचे लग्न झाले. त्याच्या सासरकडून त्याच्या पत्नीच्या आजाराविषयी माहिती लपवण्यात आली. ही महिला लग्नाआधी ऍक्यूट स्किझोफ्रेनिया आजाराने पीडित होती. तिने लग्नानंतर घरी आणि मधुचंद्राच्या काळातही असामान्य वर्तणूक दिली. जानेवारी २००६ मध्ये त्या महिलेला दवाखान्यात नेण्यात आले असता, डॉक्टरांनी ही महिला ऍक्यूट स्किजोफ्रेनियाने पीडित असल्याचे सांगितले.