किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.69° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 2.94 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.99°से. - 28.58°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.07°से. - 29.1°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 28.81°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.93°से. - 29.28°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.59°से. - 28.72°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादल22.96°से. - 28.47°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलबंगळुरू, ३ जानेवारी – देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच कर्नाटक सरकारने राज्याच्या सीमेवरील तपासणी वाढवली आहे. विशेषत: महाराष्ट्राच्या सीमेवर अधिक काळजी घेण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.
मागील आठवड्यात देशभरात कोरोना आणि ओमिक्रॉन बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील बाधितांची संख्या सातत्याने वाढ आहे. त्यामुळे महाराष्ट्राला लागून असलेल्या शहरांच्या सीमांवर कडक दक्षता ठेवण्याच्या सूचना कर्नाटक सरकारने दिल्या आहेत. कोरोना लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या तसेच आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल असलेल्या प्रवाशांनाच कर्नाटकात प्रवेश मिळणार असल्याचे बोम्मई यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राला लागून असलेल्या अन्य सर्व नाक्यावर तपासणीसाठी कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत. कडक सुरक्षेमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार असला तरी, यामागे नागरिकांच्या आरोग्य सुरक्षाचा हेतू असल्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले.
दरम्यान, कर्नाटक सरकारच्या कडक निर्णयामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातून बंगळुरूला जाणार्या अनेक बसेस परत पाठवण्यात आल्याची माहिती आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूरहून खाजगी बसेसने जाणार्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे, तर आरटी-पीसीआर चाचणी अहवाल आणि दोन्ही मात्रा न घेतलेल्या नागरिकांना परत पाठवण्यात येत आहे. परिणामी शेकडो प्रवासी अडचणीत आल्याचे सांगण्यात येत आहे.