|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:39 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 23.99° से.

कमाल तापमान : 24.65° से.

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 64 %

वायू वेग : 3.29 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

23.99° से.

हवामानाचा अंदाज

23.99°से. - 28.52°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

23.69°से. - 28.91°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.85°से. - 28.87°से.

गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.96°से. - 28.66°से.

शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

23.35°से. - 28.38°से.

शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

22.91°से. - 28.26°से.

रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादल
Home » जम्मू काश्मीर-लद्दाख, राज्य » तोयबाचा कमांडर पर्रेसह दोन अतिरेक्यांचा खात्मा

तोयबाचा कमांडर पर्रेसह दोन अतिरेक्यांचा खात्मा

पाकिस्तानी हमजाचा समावेश,
श्रीनगर, ३ जानेवारी – श्रीनगरमधील शालिमार परिसरात आज सोमवारी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ कमांडर सलिम पर्रेसह दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. यात पाकिस्तानातील एका वरिष्ठ अतिरेक्याचाही समावेश आहे.
चकमकीत ठार झालेल्या दुसर्‍या अतिरेक्याचे नाव हाफिज उर्फ हमजा असून, बांदिपुरा येथे त्याने केलेल्या हल्ल्यात दोन पोलिस कर्मचारी हुतात्मा झाले होते, अशी माहिती काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजयकुमार यांनी दिली. बांदिपुरात अतिरेकी हल्ला केल्यानंतर पळ काढून तो श्रीनगर येथे आला होता, असे त्यांनी सांगितले.
तोयबाचा कमांडर सलिम पर्रे आणि एक विदेशी अतिरेकी श्रीनगरच्या शालिमार भागात आले असल्याची गोपनीय माहिती आम्हाला दुपारी प्राप्त झाली. यावेळी झडलेल्या चकमकीत पर्रेचा खात्मा करण्यात आला. मात्र, विदेशी अतिरेकी पळ काढण्यात यशस्वी झाला. सुरक्षा दलाने पाठलाग करून त्यालाही टिपले, असे विजयकुमार यांनी सांगितले.
चकमकीनंतर त्याची ओळख पटवण्यात आली. हमजा असे नाव असलेल्या या अतिरेक्याने पाकिस्तानातून काश्मिरात घुसखोरी केली होती. त्याने बांदिपुरा येथे केलेल्या हल्ल्यात दोन पोलिस हुतात्मा झाले होते. बांदिपुरातील हल्ल्यानंतर पळ काढून तो श्रीनगरमधील हरवान परिसरात आला होता, असे विजयकुमार यांनी सांगितले.
घुसखोराचाही खात्मा
आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफच्या जवानांनी आज सोमवारी पाकिस्तानी घुसखोराचा खात्मा केला, अशी माहिती बीएसएफच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. रामगड येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफच्या पथकाला संशयित पाकिस्तानी घुसखोराच्या हालचाली आज पहाटे दिसून आल्या. त्याने घुसखोरीचा प्रयत्न कायम ठेवल्यानंतर पथकाने त्याला गोळ्या घालून ठार केले.
आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रास्त्र, हेरॉईन जप्त; बीएसएफची सांबा सेक्टरमध्ये कारवाई
जम्मू – जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दल अर्थात् बीएसएफने आज सोमवारी कारवाई करीत शस्त्रास्त्र आणि हेरॉईनची खेप जप्त केली आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. या शस्त्रास्त्र आणि हेरॉईनची तस्करी पाकिस्तानातून करण्यात आली होती.
चमलियाल सीमेवरील चौकी परिसरात जंगली गवतात लपवून ठेवलेल्या पांढर्‍या गोणीमध्ये शस्त्रास्त्रे आणि हेरॉईन ठेवण्यात आले होते. या कारवाईत तीन एके रायफली, एके रायफलींचे पाच मॅग्झिन्स, चार पिस्तूल, त्याचे सात मॅग्झिन्स, संमिश्र दारुगोळा आणि हेरॉईनची पाच पाकिटे जप्त करण्यात आली, असे अधिकार्‍यांनी सांगितले.
बीएसएफचे पथक गस्त घालत असताना त्यांना ही गोणी दिसली होती. या गोणीवर ‘कराची फर्टिलायझर्स कंपनी लिमिटेड’ असे लिहिले आहे. ही खेप ड्रोनच्या मदतीने भारतीय हद्दीत टाकण्यात आली अथवा शस्त्रास्त्र आणि मादकपदार्थांच्या तस्करांनी पाकिस्तानातून आणली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

Posted by : | on : 4 Jan 2022
Filed under : जम्मू काश्मीर-लद्दाख, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g