किमान तापमान : 26.37° से.
कमाल तापमान : 27.13° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 45 %
वायू वेग : 2.74 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.37° से.
24.96°से. - 28.52°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.69°से. - 28.91°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.85°से. - 28.87°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.96°से. - 28.66°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.35°से. - 28.38°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल22.91°से. - 28.26°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादललखनौ, ९ जानेवारी – मागील ७० वर्षांच्या काळात उत्तरप्रदेशात एकाच राजकीय पक्षाला सलग दुसर्यांदा सत्ता मिळाली तरी, पहिल्या कारकिर्दीत मुख्यमंत्रिपदी राहिलेल्या व्यक्तीला दुसर्यांदा मुख्यमंत्रिपद मिळाले नाही. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ही किमया करू शकतात का, हे १० मार्च रोजीच्या निकालातून दिसून येणार आहे.
या राज्यात पहिल्यादा विधानसभा निवडणूक १९५२ मध्ये पार पडली. त्यानंतर आतापर्यंत ७० वर्षांच्या काळात कुणीही दुसर्यांदा मुख्यमंत्री झालेला नाही. यात पक्षाला सत्ता मिळाली असली तरी सरकार प्रमुख म्हणून पहिल्या कारकिर्दीतील व्यक्तीने दुसर्यांदा जबाबदारी सांभाळली नाही. राज्यात १९५२ मध्ये संपूर्णानंद हे पहिले मुख्यमंत्री झाले. १९५७ मध्ये चंद्रभानू गुप्ता, १९६२ मध्ये सुचेता कृपलानी, १९६७ मध्ये पुन्हा एकदा चंद्रभानू गुप्तांनी ही जबाबदारी (केवळ १९ दिवस) सांभाळली. त्यानंतर चरणसिंह मुख्यमंत्री झाले. पाचव्या निवडणुकीत (१९६९) त्रिभुवन नारायण सिंह आणि त्यानंतर कमलापती त्रिपाठी यांना खुर्ची मिळाली.
सहाव्या निवडणुकीत १९७४ मध्ये नारायण दत्त तिवारी, सातव्या निवडणुकीत १९७७ मध्ये बनारसी दास, आठव्या निवडणूक १९८० मध्ये श्रीपती मिश्र, १९८५ मध्ये वीर बहादूर सिंह, १९८८ मध्ये नारायण दत्त तिवारी मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.
१० व्या विधानसभा निवडणुकीत जनता दलाचे सरकार आले आणि मुलायमसिंह यादव मुख्यमंत्री झाले. ११ व्या विधानसभा निवडणुकीत १९९१ मध्ये कल्याणसिंह यांनी प्रमुखपद सांभाळले. १२ व्या विधानसभा निवडणुकीत १९९३ मध्ये पुन्हा एकदा मुलायमसिंह यादव मुख्यमंत्री बनले. १ वर्ष १८१ दिन या पदावर राहिल्यानंतर ही जागा बसपाच्या मायावती यांनी घेतली. यानंतर १ वर्ष १५४ दिवस राष्ट्रपती राजवट लागू होती.
उत्तराखंडमध्ये प्रचारासाठी केवळ २२ दिवस
डेहराडून ः विधानसभा निवडणुकीत २१ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार असून, १४ फेबु्रवारीला मतदान होत आहे. उमेदवारांना प्रचारासाठी केवळ २२ दिवसांचाच कालावधी मिळणार असल्याचे दिसून येते. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी १४ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. सध्या या राज्यात चौथी विधानसभा अस्तित्वात असून, तिचे गठन १८ मार्च २०१७ रोजी करण्यात आले. मुख्यमंत्री धामी सध्या भाजपा सरकारचे नेतृत्व करीत आहेत. विशेष म्हणजे, एकाच विधानसभा कालावधीत झालेले ते तिसरे मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी त्रिवेंद्रसिंह रावत आणि तीरथसिंह रावत यांनी खुर्ची सांभाळली होती. उत्तराखंड विधानसभेच्या एका कालावधीत तीन मुख्यमंत्री झाल्याने हे राज्य मुख्यमंत्रिदाच्या संधीचे असल्याचे गंमतीने बोलले जाते.
पंजाबमध्ये महिला मतदारांची संख्या वाढली
चंदीगड ः मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा राज्यात महिला मतदारांची संख्या वाढली असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. हे प्रमाण ७.५८ टक्के असून, १८ ते १९ वर्षे वयोगटातील एकूण २ लाख ७८ हजार ९६९ मतदार पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार आहे.
पंजाबचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. एस. करुणा राजू यांच्यानुसार, राज्यात १४,७५१ ठिकाणी २४,६८९ केंद्रे तयार करण्यात येतील. शहरी भागात ७,७२७ आणि ग्रामीण भागात ही संख्या १६,९६२ इतकी असेल. २०१७ मधील विधानसभा निवडणुकीत एकूण मतदारांची संख्या १ कोटी ९८ लाख ७९ हजार ६९ इतकी होती. यात महिलांचे प्रमाण ९३ लाख ७५ हजार ५४६ इतके होते. यंदा त्यात वाढ झाली असून, ही संख्या आता १ कोटी ८६ हजार ५१४ वर पोहोचली आहे. मतदार वाढीचे प्रमाण ७.५८ टक्के आहेत.
गोव्यात मुख्यमंत्रिपदासाठी दुसरा चेहरा नाही
पणजी : सध्या गोव्यात भाजपाप्रणित रालोआचे सरकार असून, विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढवण्यात येत आहे. भाजपा नेतृत्वाने त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणताही चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी समोर आणलेला नाही.
गोव्यात दोन जिल्ह्यांचा समावेश असून, विधानसभेच्या ४० जागा आहेत. मागील निवडणुकीत कॉंग्रेसला सर्वाधिक जागा जिंकूनही या पक्षाला सरकार बनवता आले नव्हते. यंदा राज्यात आम आदमी पार्टी, तृणमूल कॉंग्रेस या पक्षानेही धडक दिली आहे. त्यामुळे भाजपाला पुन्हा सत्ता राखता येईल का, याविषयी १० मार्च रोजी निकालातूनच समजून येणार आहे. केंद्र सरकारने ३० मे १९८७ रोजी पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. सध्या सातवी विधानसभा अस्तित्वात असून, ती १४ मार्च २०१७ रोजी अस्तित्वात आली होती. राज्यात सध्या रालोआ सरकार असून, मुख्यमंत्री प्रमोद सावंत आहेत.
मणिपुरात भाजपा महिलांना संधी देणार
इम्फाळ : मणिपुरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून महिला उमेदवारांना मोठी संधी मिळणार असल्याची शक्यता आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अलिकडेच एका कार्यक्रमात याबाबतचे संकेत दिले होते.
भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री, पहिल्या शिक्षण मंत्री, पहिल्या विदेश मंत्री पहिल्या अर्थमंत्री या सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच नियुक्त केले असल्याचे नड्डा यांनी म्हटले होते. याच पृष्ठभूूूमीवर यंदाच्या निवडणुकीत महिलांना उमेदवारी मिळणार असल्याचे सांगण्यात येते.
मणिपूर विधानसभा निवडणुकीत ६० जागांसाठी २७ फेब्रुवारी आणि ३ मार्च रोजी मतदान होत आहे. सध्या बारावी विधानसभा अस्तित्वात असून, तिचे गठन १५ मार्च २०१७ रोजी करण्यात आले होते. राज्यात भाजपाप्रणित रालोआ सरकार असून, मुख्यमंत्रिपदी एन. बिरेनसिंह विराजमान आहेत.
मागील निवडणुकीतील मतदान दोन टप्प्यात पार पडले होते. यात एकूण ८६.६३ टक्के मतदान झाले. कॉंग्रेसला सर्वांधिक २८ जागा मिळाल्या होत्या. यानंतर दुसर्या क्रमांकावर भाजपाला २१, एनपीएफ ४, एनपीपी ४, एलजीपी १, तृणमूल कॉंग्रेसला १ आणि १ जागा अपक्षाला मिळाली होती. यानंतर भाजपाने एनपीएफ, एनपीपी, एलजीपी यांच्या सहकार्याने राज्यात सरकार स्थापन केले होते. सद्यस्थितीत ७ जागा रिक्त आहेत. विद्यमान विधानसभाचा कालावधी १९ मार्चला समाप्त होत आहे.