किमान तापमान : 26.3° से.
कमाल तापमान : 26.93° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 44 %
वायू वेग : 2.85 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.3° से.
25.41°से. - 28.17°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.25°से. - 28.57°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.42°से. - 28.53°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.23°से. - 28.31°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.73°से. - 28.08°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल23.39°से. - 28.07°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादलपंतप्रधान मोदींनी पाठवली विशेष भेट,
नवी दिल्ली, १० जानेवारी – पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी वाराणसीत गेले होते. त्यावेळी काही कर्मचारी अनवाणीच काम करीत असल्याचे त्यांनी पाहिले. मोदी यांनी याची दखल घेत, या सर्व कर्मचार्यांसाठी तागाच्या विशेष चपला पाठविल्या आहेत.
काशी विश्वनाथ धाम मंदिराच्या आवारात चामड्याची किंवा रबराची पादत्राणे निषिद्ध असल्यामुळे मंदिरातील कर्मचारी अनवाणी काम करतात. हे लक्षात आल्यानंतर मोदींनी काशी विश्वनाथ धाममधील कर्मचार्यांसाठी तागाच्या चपलांचे शंभर जोड पाठविले आहेत.
सूत्रांनी सांगितले की, मोदींचे काशी विश्वनाथमधील प्रत्येक गोष्टीकडे बारीक लक्ष असते. येथील प्रत्येक कामात त्यांची भावनिक गुंतवणूक आहे. तसेही वाराणसीतील प्रत्येक कामाची ते जातीने चौकशी करतात. ते स्वत: संघर्षातून वर आले आहेत. त्यामुळे त्यांना गरिबांविषयी कणव आहे. मागील महिन्यात मोदींच्या हस्ते काशी विश्वनाथ धामच्या पहिल्या टप्प्यातील कामाचे लोकार्पण झाले आहे.