किमान तापमान : 24.31° से.
कमाल तापमान : 24.96° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 3.61 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.31° से.
23.99°से. - 28.17°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.25°से. - 28.57°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.42°से. - 28.53°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.45°से. - 28.31°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.73°से. - 28.08°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल23.39°से. - 28.07°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादल४०० किलो वजन; वृद्ध दाम्पत्याची सेवा,
लखनौ, १० जानेवारी – उत्तरप्रदेशातील अलिगड कुलपांसाठी जगप्रसिद्ध आहे. येथे वास्तव्य करणार्या वृद्ध दाम्पत्याने राममंदिराच्या सुरक्षेसाठी विशाल कुलूप तयार केले असून, या कुलपाची उंची १० फूट आणि वजन ४०० किलो आहे. ३० किलो वजनाच्या किल्लीने हे कुलूप उघडते.
सत्यप्रकाश आणि रुक्मिणी असे या वृद्ध दाम्पत्याचे नाव आहे. ते अलिगडच्या ज्वालापुरी भागातील रहिवासी आहेत. त्यांनी तयार केलेल्या कुलपाची समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. हे जगातील सर्वांत मोठे कुलूप असल्याचा दावा दाम्पत्याने केला आहे.
अयोध्येतील राममंदिराला समर्पित करण्यासाठी हे कुलूप तयार केल्याची माहिती सत्यप्रकाश आणि रुक्मिणी यांनी दिली. दोन लाख रुपयांचा खर्च हे कुलूप तयार करण्यासाठी आला. सहा महिने परिश्रम घेऊन हे कुलूप तयार करण्यात आले. त्यावर रामदरबाराची आकृती कोरण्यात आली आहे, अशी माहिती सत्यप्रकाश यांनी दिली.
व्याजाने घेतले पैसे
सहा इंच जाड असलेल्या या कुलपाची कडी चार फुटांची आहे. या कुलपासाठी दोन किल्ल्या तयार करण्यात आल्या. सत्यप्रकाश मजुरीवर कुलूप तयार करतात. हे कुलूप तयार करण्यासाठी मी व्याजाने पैसे घेतले. कुलूप तयार करण्याच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी मदतीची गरज आहे, असे सत्यप्रकाश यांनी सांगितले.
कुलपात होणार फेरबदल
अयोध्येला पाठवण्यापूर्वी या कुलपात काही फेरबदल केले जाणार आहेत. या कुलपाचा बॉक्स, लिव्हर आणि इतर साहित्य पितळाचा वापर करून तयार केले जाणार आहेत. हे कुलूप गंजू नये म्हणून त्यावर स्टीलचे आवरण लावले जाईल. यासाठी आणखी काही निधीची गरज असल्याचे सत्यप्रकाश यांनी सांगितले.