किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.69° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 2.94 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.99°से. - 28.58°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.07°से. - 29.1°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 28.81°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.93°से. - 29.28°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.59°से. - 28.72°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादल22.96°से. - 28.47°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलअत्तर व्यापारी जैनची कबुली,
कानपूर, ११ जानेवारी – उत्तरप्रदेशातील कानपूर येथे आयकर विभागाने अत्तर व्यापारी पीयूष जैनच्या घरावर छापेमारी करून १९६ कोटी रुपयांची रोख आणि मोठ्या प्रमाणात दागिने जप्त केले होते. वस्तू व सेवा कर अर्थात् जीएसटी बुडवून हा पैसा आपण जमा केला असल्याची कबुली जैनने दिली आहे.
या छापेमारीत जैनच्या विरोधात कर बुडवेगिरीचे अनेक पुरावे सापडले आहेत. माझा व्यवसाय व्यापक प्रमाणात पसरलेला आहे. मी आजवर जीएसटी कधीच भरला नाही. त्यातून हा पैसा कमावला, अशी माहिती त्याने चौकशीत दिली.
अधिकार्यांनी पीयूष जैनची तुरुंगात सोमवारी अनेक तास चौकशी केली. यावेळी अधिकार्यांनी त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. चौकशीत त्याने कबूल केले की, घरात सापडलेले १९६ कोटी रुपये आपलेच असून, ते अत्तर व्यवसायातून कमावले आहेत. अत्तर तयार करण्यासाठी लागणार्या कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी लागलेल्या पैशांचे देयक फाडण्यात आले नाही. त्यातूनच इतका पैसा कमावला. तथापि, हा कच्चा माल कोणाकडून खरेदी केला, हे त्याने अद्याप सांगितले नाही.
दरम्यान, जैनला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. अधिकार्यांनी त्याच्या १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. ती मान्य करीत न्यायालयाने त्याच्या कोठडीत २३ जानेवारीपर्यंत वाढ केली.
जैनच्या घरातील छापेमारी १९७ कोटी रुपयांची रोकडसोबतच २३ किलो सोने जप्त करण्यात आले होते. जैनच्या घरातील ही रक्कम मोजण्यासाठी आयकर अधिकार्यांना पाच दिवस लागले होते. या कारवाईत जैनच्या आनंदपुरी येथील घरात एक तळघर सापडले आहे. त्या तळघरात रोख रक्कम आणि सोन्याच्या विटा सापडल्या. तळघरातील कारवाईचा व्हिडीओही समोर आला आहे.