किमान तापमान : 24.99° से.
कमाल तापमान : 26.04° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 2.28 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
24.85°से. - 28.15°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.65°से. - 28.75°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.74°से. - 28.47°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.32°से. - 29.01°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.06°से. - 28.38°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश23.5°से. - 28.34°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादललखनौ, ११ जानेवारी – उत्तरप्रदेशसह इतर पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. देशातील महत्त्वाचे राज्य असलेल्या उत्तरप्रदेशात जर राजकारण क्षणाक्षणाला बदलत आहे. त्यातच बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी, आपण यावेळी विधानसभेची निवडणूक लढविणार नसल्याचे आज मंगळवारी जाहीर केले.
बसपाचे सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा यांनी याबाबतची माहिती दिली. मायावती निवडणूक लढवणार नाही. मी स्वतःसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
समाजवादी पक्षाकडे ४०० उमेदवार नसतील तर हा पक्ष ४०० जागा कशा जिंकणार, समाजवादी पार्टी किंवा भाजपा सत्तेवर येणार नाही, बसपा उत्तरप्रदेशात सरकार स्थापन करणार आहे, असे मिश्रा यांनी सांगितले.
अपक्ष आमदार, मंत्री गोविंद गौडे भाजपात येणार
पणजी – गोव्यातील मंत्री आणि अपक्ष आमदार गोविंद गौडे यांनी आज मंगळवारी आमदारकीचा राजीनामा दिला. येत्या एक-दोन दिवसांत ते भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
गौडे यांनी २०१७ च्या निवडणुकीत भाजपाप्रणीत रालोआ सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यानंतर मनोहर पर्रिकर यांच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद देण्यात आले होते. पर्रिकर यांच्या निधनानंतर प्रमोद सावत मुख्यमंत्री झाले. त्यांच्या सरकारमध्येही ते मंत्री म्हणून कायम राहिले.
भाजपाकडून मला पक्ष प्रवेशाचे निमंत्रण मिळाले. मला फार आनंद झाला. मागील पाच वर्षांपासून मी भाजपा सरकारमध्ये आहे. अपक्ष म्हणून राहणे फार कठीण असते. राजकीय मंच आवश्यक असतो, याची जाणीव मला झाल्याचे त्यांनी सांगितले.