किमान तापमान : 26.14° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 2.98 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
23.94°से. - 28.01°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 28.79°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलउत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक,
नवी दिल्ली, ११ जानेवारी – उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीतील भाजपा उमेदवारांच्या यादीला अंतिम रूप देण्यासाठी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात आज मंगळवारी एक महत्त्वपूर्ण बैठक झाली.
या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष, उत्तरप्रदेश भाजपाचे प्रभारी धर्मेद्र प्रधान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्रीद्वय केशवप्रसाद मौर्य तसेच दिनेश शर्मा, प्रदेश भाजपा अध्यक्ष स्वतंत्रदेवसिंह, प्रदेश भाजपा संघटनमंत्री सुनील बंसल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. हे दोघेही आभासी पद्धतीने बैठकीत सहभागी झाले.
उत्तरप्रदेशमध्ये सात टप्पयात विधानसभा निवडणूक होत असून, पहिल्या टप्प्यातील मतदान १० फेब्रुवारीला होणार आहे. राज्यातील भाजपाचे उमेदवार निश्चित करण्यासाठी या बैठकीत व्यापक विचारमंथन करण्यात आले. १४ वा १५ जानेवारीपर्यंत भाजपा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
याच दरम्यान भाजपा नेते स्वामीप्रसाद मौर्य यांनी योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यामुळे उद्भवललेल्या परिस्थितीवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. स्वमीप्रसाद मौर्य यांच्यासोबत आणखी काही भाजपा आमदार राजीनामा देण्याची शक्यता आहे. राज्यातील नाराज भाजपा नेत्यांशी चर्चा करून त्यांचे मन वळवण्याची जबाबदारी अमित शाह यांनी प्रदेश भाजपा अध्यक्ष स्वतंत्रदेवसिंह तसेच प्रदेश भाजपा संघटन मंत्री सुनील बन्सल यांच्यावर सोपवली आहे.