किमान तापमान : 27.05° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
24.55°से. - 27.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.91°से. - 28.4°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.68°से. - 28.77°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.68°से. - 28.73°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.16°से. - 28.59°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.07°से. - 27.85°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादल‘वर्क फ्रॉम होम’चा आदेश,
नवी दिल्ली, ११ जानेवारी – दिल्लीत कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. दिल्लीतील सर्व खाजगी कार्यालये बंद करण्यात आली आहेत. तथापि, दिल्लीत टाळेबंदी लावण्यात येणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या बैठकीत दिल्लीतील निर्बंध आणखी कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिल्लीतील खाजगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याचा निर्णय आधी घेण्यात आला होता, हा निर्णय फिरवत आता ही कार्यालये बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला. या कार्यालयांतील कर्मचार्यांना घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे. सरकारी कार्यालये मात्र ५० टक्के क्षमतेने काम करू शकतील.
फक्त दिल्लीत निर्बंध लावून चालणार नाही तर, राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातही निर्बंध लावण्याची मागणी केजरीवाल यांनी केली आहे. यावर विचार करण्याचे आश्वासन केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी दिले आहे.
दिल्लीतील रेस्टॉरंट आणि बार बंद राहतील, पण रेस्टॉरंटमधून घरी भोजन वा नाश्ता मागविण्याची मुभा राहील. सार्वजनिक ठिकाणी लोक मुखाच्छादन लावून वावरले तर कोरोनाला आळा बसू शकतो, असे ते म्हणाले. सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणार्यांना दंड ठोठावला जात आहे. दिल्लीत सम-विषम पद्धतीने दुकाने उघडी ठेवण्याची अनुमती देण्यात आली आहे.
दिल्लीची योगशाळा
गृहविलगीकरणात असलेल्या कोरोनाबधितांसाठी दिल्लीची योगशाळा कार्यक्रमांतर्गंत योग आणि प्राणायामचे वर्ग चालवण्याची घोषणा मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केली आहे. सकाळी ६ ते ११ आणि दुपारी ४ ते सायंकाळी ७ अशा ८ तासांत योग आणि प्राणायामचे ८ वर्ग होतील. ४० हजार लोक यात सहभागी होतील, असा अंदाज आहे, असे ते म्हणाले.