किमान तापमान : 26.96° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 45 %
वायू वेग : 5.33 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
23.94°से. - 29.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.38°से. - 28.63°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.28°से. - 29.45°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.43°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.15°से. - 28.01°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.72°से. - 27.96°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलचंदीगड, १२ जानेवारी – पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्या भावाने आज बुधवारी भाजपात प्रवेश केला. ही घडामोड पुन्हा सत्तेत येण्याचे स्वप्न रंगवत असलेल्या कॉंगे्रसला मोठा हादरा देणारी आहे. त्यांच्या प्रवेशामुळे राज्यात भाजपाची ताकद आणखी वाढणार आहे.
मुख्यमंत्री चन्नी यांचे चुलत बंधू जसविंदरसिंग धालिवाल यांनी भाजपात प्रवेश केला. केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासह काही वरिष्ठ नेत्यांनी धालिवाल यांचे स्वागत केले. त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे पंजाबच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धालिवाल यांचे आणखीही काही समर्थक लवकरच भाजपात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही महिन्यांत पंजाबच्या राजकीय वर्तुळात मोठमोठे हादरे देणार्या घटना घडल्या आहेत. नवज्योतसिंग सिद्धूंशी असलेले मतभेत विकोपाला गेल्यानंतर कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि नवीन पक्ष स्थापन करून भाजपासोबत युती केली.
मणिपुरात भाजपा, कॉंग्रेसच्या वाटा बिकट
इम्फाळ – राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेनसिंह यांच्या लोकप्रियतेत कमालीची घट झाली असून, सध्या राज्यात भाजपाविरोधी लाट असल्याचे बोलले जाते. कॉंग्रेस निवडणुकीत याचाच फायदा घेण्याच्या तयारीत असली तरी, कॉंग्रेससमोर राज्यातील नेतृत्वाचे संकट असल्याने याठिकाणी विद्यमान स्थितीत या दोन राष्ट्रीय पक्षांना सत्ता मिळवणे कठीण असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.
सूत्रांनुसार, राज्यात भाजपासमोर सत्ता वाचवण्याचे मोठे आव्हान आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाने ४० जागांचे लक्ष्य ठेवले आहे. मागील निवडणुकीत २१ जागांवर समाधान मानावे लागले होते. लहान-लहान स्थानिक पक्षांसोबत युती करून सरकार स्थापन केले. ६० सदस्यांच्या विधानसभेत २८ जागा जिंकूनही कॉंग्रेसला सत्तेतून बाहेर राहावे लागले होते. पक्षाजवळ स्थानिक स्तरावर चेहर्यांची कमतरता असून, तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले ओकराम इबोबी हे पक्षाची ताकद आणि कमजोरीही आहेत. त्यांच्याविरोधात ईडीकडून तपास सुरू आहे. वरिष्ठ नेत्यांनुसार, पक्षाजवळ ईबोबीशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. त्यांच्या १५ वर्षांच्या सत्ताकाळात राज्यात शांतता निर्माण झाली. दरम्यान, आता कॉंग्रेसने ऍफ्स्पाचा मुद्दा पुढे केला आहे. पक्षाने सत्तेत आल्यास मणिपुरातून ऍफ्स्पा संपवण्याचे आश्वासन या पक्षाने दिले.
गोव्यात कॉंगे्रस पुन्हा जास्त जागा जिंकणार : वेणुगोपाल
पणजी – कॉंग्रेसमध्ये आत्मविश्वास असून, आम्ही गोवा राज्यात पुन्हा एकदा जास्त जागा मिळवून सत्ता प्राप्त करू, असे वक्तव्य ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांनी केले आहे.
मागील काही दिवसांत गोव्यात विधानसभा निवडणुकीनिमित्त कॉंग्रेस आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यात आघाडी होण्याची बातमी बाहेर आली होती. यावर कॉंग्रेसच्या वतीने वेणुगोपाल यांनी ट्विटच्या माध्यमातून यावर पूर्णविराम लावला. तृणमूल कॉंग्रेससोबत कोणत्याही प्रकारची आघाडी करणार नाही. खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. आम्ही गोव्यात बहुमताने सत्ता प्राप्त करू, असा दावा वेणुगोपाल यांनी केला.
मायकल लोबो कॉंग्रेस
गोवा सरकारमधील माजी मंत्री मायकल लोबो यांनी पत्नी दलिला यांच्यासह कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.लोबो यांनी सोमवारी पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता.