किमान तापमान : 27.05° से.
कमाल तापमान : 27.68° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.68° से.
24.55°से. - 27.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.91°से. - 28.4°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.68°से. - 28.77°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.68°से. - 28.73°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.16°से. - 28.59°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.07°से. - 27.85°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलबसपाचा माजी आमदारही आला, पर्यावरण मंत्री दारासिंह चौहान यांचा राजीनामा,
नवी दिल्ली, १२ जानेवारी – स्वामीप्रसाद मौर्य यांनी मंगळवारी योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर भाजपानेही समाजवादी पक्ष, कॉंग्रेस तसेच बसपाला भगदाड पाडले.
सिरसागंज विधानसभा मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे आमदार हरिओम यादव तसेच बेहट विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे आमदार नरेश सैनी यांनी आज भाजपात प्रवेश केला. एतमादपूर मतदारसंघातील बसपाचे माजी आमदार धर्मपालसिंह यांनीही भाजपात प्रवेश केला. नवी दिल्ली येथील भाजपा मुख्यालयात उत्तरप्रदेश भाजपा अध्यक्ष स्वतंत्रदेवसिंह यांनी या सर्वांचे स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि अन्य भाजपा नेते उपस्थित होते.
हरिओम यादव सलग तीनवेळा सिरसागंज विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. सपा नेते रामगोपाल यादव यांच्याशी झालेल्या मतभेदामुळे त्यांनी सपा सोडण्याचा आणि भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या सर्वांच्या प्रवेशामुळे भाजपाच्या निवडणूक प्रचाराला गती मिळणार असल्याचा दावा स्वतंत्रदेवसिंह यांनी केला. स्वामीप्रसाद मौर्य यांच्यासोबत त्यांच्या काही समर्थक आमदारांनीही सपात प्रवेश केला होता, त्याची भरपाई भाजपाने आज सपाच्या आमदाराला पक्षात घेऊन केली.
कॉंग्रेसच्या दोन आमदारांचाही सपात प्रवेश
कॉंग्रेसने समाजवादी पक्षाशी आघाडी करावी, अशी विनंती आम्ही पक्षाला केली होती. ती नाकारण्यात आल्यामुळे आम्ही सपात प्रवेश करीत असल्याचे कॉंग्रेसचे आमदार मसूद अख्तर आणि इमरान मसूद यांनी सांगितले.
पर्यावरण मंत्री दारासिंह चौहान यांचा राजीनामा
उत्तरप्रदेशात भाजपाला पुन्हा एक धक्का
स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंगळवारी मंत्रिपदाचा राजीनामा देत दिलेल्या धक्क्यानंतर आज बुधवारी योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील पर्यावरण मंत्री दारासिंह चौहान यांनीही राजीनामा देत, भाजपाला पुन्हा एक धक्का दिला आहे.
भाजपाच्या किमान तीन आमदारांनीही पक्ष सोडणार असल्याची घोषणा केली आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी समर्थकांसोबत चर्चा करणार आहे, असे दारासिंह चौहान यांनी सांगितले. तुम्ही समाजवादी पक्षात प्रवेश करणार आहात का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. राज्यातील मागासवर्गीय आणि वंचितांना सध्याच्या सरकारकडून न्याय मिळालेला नाही. त्यामुळे मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, असे चौहान यांनी पत्रकारांना सांगितले.